आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jobs Crisis | Unemployment Decreased In Cities, Increased In Villages; 28 Percent Pass Rate In Haryana Rajasthan

नोकऱ्यांचे संकट:शहरांत बेरोजगारी घटली, गावांत वाढली; हरियाणा-राजस्थानात दर 28 टक्के पार

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात फेब्रुवारीमध्ये बेरोजगारी दर वाढून ७.४५ टक्के

देशात फेब्रुवारी महिन्यात बेरोजगारी दर ७.४५% राहिला. जानेवारीत ७.१४% होता. महत्त्वाचे म्हणजे शहरी भागांत बेरोजगारी दर ८.५५ टक्क्यांनी घटून ७.९३% झाला. तर ग्रामीण भागांत ६.४५% ने वाढून ७.२३% वर पोहोचला. म्हणजे बेरोजगारी दर अजूनही शहरांमध्येच जास्त आहे. सीएमआयईच्या या सर्व्हेनुसार, देशात सर्वाधिक बेरोजगारी दर राजस्थान व हरियाणात आहे. हरियाणात २९.४% आणि राजस्थानात २८.३% आहे. छत्तीसगड (०.८%) आणि मध्य प्रदेश (२.०%) सर्वात चांगल्या स्थितीत दिसत आहेत. इतर एका अहवालानुसार, गेल्या आर्थिक वर्षात ग्रामीण महिलांची स्थिती चांगली राहिली. शहरी महिलांमध्ये बेरोजगारी दर २७.९% पर्यंत होता, तर ग्रामीण महिलांमध्ये तो केवळ ४.५% नोंदवला होता.

केंद्र-राज्यांत सरकारी नियुक्त्या १ वर्षात ८% घटल्या... राज्यांत प्री-कोविडपेक्षाही कमी भरती
शिवा राजोरा | नवी दिल्ली
कोरोनाकाळानंतर सरकारी नोकऱ्या वाढणे सुरू झाले होते, पण २०२२ मध्ये केंद्र आणि राज्यांमध्ये नियुक्त्या घटल्या आहेत.

{केंद्र आणि राज्य सरकारांच्या एनपीएस डेटानुसार, २०२२ मध्ये एकूण ५,६५,५०० नवे सबस्क्रायबर जोडले गेले. ही संख्या २०२१ च्या तुलनेत ८% कमी आहे. {केंद्र सरकारकडून एकूण १.१८ लाख नवे सबस्क्रायबर एनपीएसशी जोडले. पैकी ६५.२% लोक १८ ते २८ वयोगटातील आहेत. २०२१ मध्ये ही सरासरी ६७.८% होती. {राज्य सरकारांकडून एकूण ४,४७,४८० नवे सबस्क्रायबर जोडले. त्यातील ३३ टक्केच १८ ते २८ वयोगटातील आहेत. ही सरासरी गेल्या वर्षापेक्षा २% वाढली.

आयटी क्षेत्रामध्ये जगभरात कपात, भारतामध्ये वाढल्या १०% नियुक्त्या
नोकरी जॉबस्पीकनुसार, फेब्रुवारी २०२३ मध्ये भारताच्या आयटी क्षेत्रातील भरती फेब्रुवारी २०२२ च्या तुलनेत १०% वाढली आहे. तथापि, जगभरातील प्रमुख देशांत अजूनही कर्मचारी कपात सुरूच आहे. या क्षेत्रात सर्वाधिक मागणी तज्ज्ञांना आहे. जसे- डेटा अॅनालिटिकल मॅनेजर, बिग डेटा इंजिनिअर, क्लाऊड सिस्टिम अॅडमिनिस्ट्रेटर आदी. नॅसकॉमनुसार, २०२३ मध्ये भारताच्या आयटी क्षेत्राचा आकार ८.४ टक्क्यांनी वाढू शकतो.

केंद्र : २०२१ च्या तुलनेत कमी भरती, प्री-कोविडपेक्षा अधिक
नवे सब्सक्रायबर तरुण (१८-२८)
२०२२ १,१८,०२० ७६,८९५
२०२१ १,२३,६६५ ८३,८८९
२०२० ९९,०८६ ६४,५५८
२०१९ १,०६,३२६ ६८,०४८
२०१८ १,०५,४१३ ७१,०९७
एकूण ५,५२,५१० ३,६४,४८७

राज्य सरकारे : २०१८ च्या तुलनेत कमी भरती, तरुणांची संख्या घटली
नवे सबस्क्रायबर्स तरुण (१८-२८)
२०२२ ४,४७,४८० १,४९,१९२
२०२१ ४,९६,१७० १,५५,६६२
२०२० ३,८१,५३५ १,४६,९३५
२०१९ ५,३०,१५५ २,२२,३८८
२०१८ ५,१३,०७४ १,८२,८०१
एकूण २३,६८,४१४ ८,५६,९७८

बातम्या आणखी आहेत...