आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादुचाकीवरून जाणाऱ्या पती-पत्नीला कट मारत ट्रकने चिरडल्याची घटना राजस्थानच्या पालीमधील रोहटमध्ये घडली आहे. या घटनेचे CCTV फुटेजही समोर आले आहे. यात ट्रक पती-पत्नीला चिरडत पुढे निघून जात असल्याचे दिसत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात 65 वर्षीय दुदाराम मेघवाल आणि त्यांच्या 62 वर्षीय पत्नी सोना देवींचा मृत्यू झाला. हे दाम्पत्य जोधपूरच्या मंडोरमधील कीर्ती नगरचे रहिवासी होते.
दुदाराम यांचे पुत्र रविंद्र यांनी सांगितले की, त्यांचे वडील निवृत्त शिक्षक होते. त्यांना शेतीची आवड होती. म्हणून त्यांनी पालीच्या मादडीजवळ जमीन खरेदी केली होती आणि ते शेती करत होते. दोघेही रविवारी सकाळई मादडीजवळील फार्म हाऊसवर गेले होते. सायंकाळी ते परतत असताना हा अपघात घडला.
काही सेकंदांतच झाला मृत्यू
रोहटच्या PHED कार्यालयासमोरून दोघेही स्कुटीवरून जोधपूरकडे जाताना दिसतात. मागून वेगाने येणारा ट्रक त्यांना कट मारून जातो. यावेळी स्कुटीचे संतुलन बिघडते आणि दोघेही रस्त्यावर पडतात. यावेळी महिलेच्या अंगावरून ट्रकचे मागील टायर जाते. महिलेचा घटनास्थळीच मृत्यू होतो. तर जखमी अवस्थेतील हेड मास्तरांचा उपचारादरम्यान मृत्यू होतो.
अपघात इतका भीषण होता की महिलेच्या मृतदेहाचे तुकडे रस्त्यावर पसरले होते. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने शरीराचे अवयव गोळा केले. पॉलिथिनच्या पिशवीत बांधून मृतदेह शवागारात ठेवण्यात आला.
3 वर्षांपूर्वी मुलाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
मृत दाम्पत्याला चार मुले आणि एक मुलगी आहे. सर्वात मोठ्या मुलाचा 3 वर्षांपूर्वीच ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला होता. पालीच्या रोहटमधील रुग्णालयात सोमवारी सकाळी शवविच्छेदनानंतर मृतदेह कुटुंबीयांना सोपवण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.