आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जोधपूर हिंसाचाराचे PHOTOS:कलम 144 लागू असूनही जोधपूरमध्ये हिंसाचार; लाठीचार्ज, दगडफेक अन् जाळपोळ

जोधपूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदच्या दिवशी मोठा गोंधळ झाला आहे. जोधपूरच्या जालोरी गेट परिसरात सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारानंतर मंगळवारीही दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. या गोंधळानंतर प्रशासनाने बुधवारपर्यंत जोधपूरच्या 10 भागात संचारबंदी लागू केली आहे.

त्याचबरोबर सोमवारी रात्रीपासून इंटरनेटवर बंदी घालण्यात आली आहे. खालील फोटोंमध्ये पाहा, कलम 144 लागू असतानाही जमाव जमला, दंगल, लाठीचार्ज आणि जाळपोळ...

सोमवारी जोधपूरच्या जालोरी गेट परिसरात झेंडे आणि लाऊडस्पीकर लावण्यावरून दगडफेक झाली. वादानंतर मंगळवारी सकाळी जालोरी गेट येथे नागरिक एकत्रित जमा झाले..

पोलिसांनी परिसरात जमलेल्या जमावाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जमाव सतत घोषणाबाजी करत होता. सोमवारी रात्रीच दोन समुदायांमध्ये हाणामारी आणि जाळपोळीच्या दोन घटना घडल्या.

बराच वेळ समज देऊनही जमावाने परतण्यास नकार दिला. यानंतर पोलिस आणि जमावामध्ये तणातणी आणि बाचाबाची झाली.

प्रकरण वाढत असल्याचे पाहून पोलिसांनी लाठीमार केला, त्यानंतर जमाव पळून गेला. या घटनेनंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी उच्चस्तरीय बैठक घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

लाठीचार्ज झाल्यानंतर बुट आणि चपला रस्त्यावर अशा विखुरल्या होत्या. हल्लेखोरांनी 20 हून अधिक वाहनांच्या काचा फोडल्या आणि अनेक एटीएमचीही तोडफोड केली.

हल्लेखोरांना रोखण्यासाठी तैनात असलेले पोलिस अधिकारी आणि जवानही जखमी झाले. हल्लेखोरांच्या हल्ल्यात जखमी झालेले पोलिस अधिकारी. सोमवारी रात्रीही ४ पोलिस कर्मचारी जखमी झाले.

समाजकंटकांनी शहरात एकच खळबळ उडवून दिली. यावेळी पोलिसांच्या वाहनाचीही तोडफोड करण्यात आली. दगडफेकीत अनेक मीडिया कर्मचारीही जखमी झाले आहेत.

तसेच हल्लेखोरांनी अनेक वाहनेही पेटवून दिली. दुचाकीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न करताना पोलिस कर्मचारी आणि स्थानिक नागरिक दिसून आले.

गोंधळानंतर पोलिसांनी लाठीमार केला. जालोरी गेटजवळील सूरसागर येथील भाजप आमदार सूर्यकांता व्यास यांच्या घराबाहेरही हल्लेखोरांनी गोंधळ घातला. येथे एक दुचाकीही जाळण्यात आली.

एका दंगलखोराला पोलिसांनी असे पकडून नेले. याप्रकरण आतापर्यंत 3 उपद्रवींना अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री गेहलोत सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

पोलिसांनी लाठीचार्ज करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतांना पोलिस कर्मचारी. संवेदनशील भागात पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...