आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूरमध्ये लग्नाच्या घरी झालेल्या सिलिंडरच्या स्फोटात 3 महिलांचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी घडलेल्या या दुर्घटनेत आतापर्यंत 2 मुलांसह एकूण 5 जणांचा बळी गेला आहे. तर 40 हून अधिक जण गंभीर जखमी झालेत. या सर्वांवर जोधपूरच्या महात्मा गांधी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. सकाळी जोधपूरला पोहोचलेल्या मुख्यंमत्र्यांनी जखमींना वाचवण्याचे सर्वोतपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सांगितले. तसेच अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य ती पाऊले उचलण्याचीही ग्वाही दिली.
दुसरीकडे, डॉक्टर एस एन वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप कच्छावा यांनी दुर्घटनेत गंभीरपणे होरपळलेल्या 3 महिलांचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. या घटनेत 20 कुटुंबातील 60 हून अधिक जण होरपळलेत. यामुळे वर व वधू पक्षाच्या घरी आनंदाऐवजी शोककळा पसरली आहे. स्फोट झाला त्यावेळी नवरदेव लग्नासाठी तयार होत होता.
जोधपूरहून 110 किमी अंतरावर असणाऱ्या शेरगड तालुक्यातील भुंगरा गावात ही दुर्घटना घडली. येथे लग्नासाठी आणलेल्या 5 सिलिंडरचा लागोपाठ स्फोट झाला. त्यानंतर सर्वच जखमींना जोधपूरच्या रुग्णालयात हलवण्यात आले. होरपळलेले वऱ्हाडी पाहून सर्वांच्याच डोळ्यात पाणी आले.
हा अपघात घडला त्यावेळी वर सुरेंद्र सिंह व त्याचे कुटुंबीय वरातीची तयारी करत होते. महिला मंगल गीत गात होत्या. बहिणी भाऊ कधी लग्नासाठी रवाना होईल याची वाट पाहत होत्या. संपूर्ण गाव या कुटुंबाच्या आनंदात सहभागी होण्यासाठी एकत्र जमले होते.
नवरदेवाची बहिण गंवरी कुंवर यांनी सांगितले की, घरातील आनंदाचे वातावरण एका क्षणात दुःखात बदलले...
अचानक एका सिलिंडरमधील गॅस लीकेज झाल्यामुळे आग भडकली. त्यानंतर क्षणार्धातच 5 सिलिंडर्सचा स्फोट झाला. या स्फोटात सुरेंद्र सिंहांचे संपूर्ण घर उद्ध्वस्त झाले. घरापुढे टाकलेला मंडपही भस्मसात झाला. अंगणात बसलेल्या महिलांवर एक सिलिंडर येऊन पडले. त्यात अनेक महिला होरपळल्या.
वधूसाठी आणलेला लग्नाचा जोडाही जळून गेला. अचानक घरात आरडाओरड झाली. हे ऐकून शेजारच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. त्यांनी घरात ठेवलेले इतर सिलिंडर बाहेर काढले. आतील महिला व मुलींना बाहेर काढून रुग्णालयात पोहोचवले.
2 दिवसांपासून सुरु होते फंक्शन
मी दोन दिवसांपूर्वी सासर भांडूहून भुंगराला आले होते. गुरुवारी वरात लगतच्या खोखसर गावात जाणार होती. घर नातलगांनी भरले होते. वरात निघण्यापूर्वीचे विधी उरकले जात होते. सर्वच वऱ्हाडी मंडळी तयार होत होते. महिला गाणे गात होत्या.
मी तयार होण्यासाठी शेजारच्या घरी गेले होते. त्यावेळी अचानक मोठा स्फोट ऐकू आला. गंवरीने सांगितले की, मी धावत भावाच्या घरी आले तर संपूर्ण घर आगीच्या विळख्यात सापडल्याचे दिसले. महिला व मुले जिवाच्या आकांताने ओरडत होत्या.
गंवरीने सांगितले की, घरात त्यांची आई व वहिणी होत्या. त्यांचा मृत्यू झाला. तर शेजारी प्रमोदने सांगितले की, घरात 3-4 दिवसांपासून सोहळा सुरू होता. सर्वचजण वरातीची तयारी करत होते. काही कळण्याच्या आत ही दुर्घटना घडली. जखमींना शेरगडच्या रुग्णालयात दाखल केले. तेथून त्यांना जोधपूरला हलवण्यात आले. दुपारी वरात जाणार होती. पण त्यापूर्वीच ही घटना घडली. त्यांनी सांगितले की, लग्नासाठी जवळास 20 सिलिंडर आणण्यात आले होते.
स्टोअररूममध्ये ठेवलेल्या सिलिंडरचा स्फोट
कुटुंबातील सदस्यांच्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी गॅस गळतीचा वास येत होती. स्वयंपाक्याने भट्टीजवळचे सिलिंडर चेक केले. पण स्टोअरजवळचे सिलिंडर चेक करणे विसरला. हळूहळू गॅस अंगणापर्यंत पोहोचली. तो गॅसच्या भट्टीपर्यंत पोहोचल्यानंतर लगेचच आग सर्वत्र पोहोचली.
भट्टीजवळच्या सिलिंडरने आग पकडल्यानंतर स्फोट झाला. ही घटना घडली तेव्हा अंगण पाहुण्यांनी भरले होते. वरातीची तयारी सुरू होती. आग एवढ्या वेगाने पसरली की, महिलांच्या साड्या त्यांच्या अंगाला चिकटल्या.
12 वर्षीय करणसिंहची आई, आजी व बहिण तिन्ही जळाल्या
वर सुरेंद्रच्या घराशेजारी राहणाऱ्या 12 वर्षीय करणसिंहने सांगितले की, तो अंगणात खेळत होता. सुरेंद्रच्या घरी आई, बहिण व आजी होती. अचानक गॅसचा स्फोट झाला व लोक होरपळले. आई, आजी व बहिणीसोबत मी ही शेरगडच्या रुग्णालयात गेलो. त्यानंतर त्यांच्यासोबतच जोधपूरला आलो.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.