आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूरमध्ये झेंडा लावण्यावरून सुरू झालेल्या हिंसाचारानंतर चार दिवसांनी जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आहे. दरम्यान, या दंगलीचा आतापर्यंतचा सर्वात भयानक व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दंगलखोरांनी दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाच्या पाठीत चाकूने वार केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
दीपक असे या तरुणाचे नाव असून तो मंगळवारी झालेल्या हिंसाचारात जखमी झाला होता. दंगलीच्या दिवशी, दीपक आणि लोकेश सिंह हे दोन भाऊ लोकांना दंगलीच्या वेळी घरातच राहण्यासाठी आणि दुकाने बंद ठेवण्याचा इशारा देत होते. दोन्ही भाऊ मोती चौकातून सोनारांच्या गल्लीतून आले असता त्यांच्यासमोर दंगलखोरांचा जमाव होता. त्यांच्या हातात शस्त्रे होती.
लोकेशने गाडी जोरात पळवली. दीपक मागच्या सीटवर बसला होता. दरम्यान, पांढऱ्या कपड्यातील एक तरुण धावत त्यांच्या दुचाकीचा पाठलाग करू लागला. दोघांना काही समजण्यापूर्वीच दंगेखोराने दीपकच्या पाठीत वार केला. दहशतीच्या त्या दिवसाची कहाणी लोकेशच्या तोंडून ऐका.
लोकेशच्या म्हणण्यानुसार, 'दंगलखोरांनी तोंडावर कपडा बांधलेला होता. त्यांना मारा, कापून टाका, असे ओरडत होते. हे पाहताच आम्ही लोकांना सतर्क करू लागलो. या दरम्यान, दंगलखोराने कधी चाकूहल्ला केला हे समजले नाही. चाकूचा वार होताच दीपक वेदनेने मोठयाने ओरडू लागला. तो दुचाकी थांबवण्यास सांगू लागला. गाडीवरून पडू लागला. कोणतरी त्याला दगड मारला असल्याचे तो सांगू लागला परंतु त्यावेळची परिस्थिती पाहता मी दुचाकी थांबवू शकत नव्हतो.
दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या महिलाबाग हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर समजले की पाठीवर दगड लागला नसून चाकू मारलेला आहे. येथून त्याला मथुरादास माथूर रुग्णालयात नेण्यात आले. दुपारी तीनच्या सुमारास दीपकला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले. त्यानंतर डॉक्टरांनी चाकू बाहेर काढला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.