आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना लस:जॉन्सन अँड जाॅन्सनने मागितली तिसरा टप्पा चाचणीची परवानगी

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमेरिकन कंपनी जॉन्सन अँड जॉन्सनने भारतात कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी परवानगी मागितली आहे. तथापि, भारतात आपत्कालीन वापराच्या मंजुरीसाठी क्लिनिकल ट्रायलची गरज नाही. भारताचे औषधी महानियंत्रकाकडून (डीसीजीआय) अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. लवकरच विषय तज्ज्ञांच्या समितीची बैठक होऊन यावर निर्णय होणे अपेक्षित आहे.

सूत्रांच्या मते जॉन्सन अँड जॉन्सनकडून डीसीजीआयला दिलेल्या अर्जात म्हटले की, कंपनी भारतात ६०० लोकांवर चाचणी घेऊ इच्छित आहे. दोन समूहासाठी चाचणीसाठी अर्ज देण्यात आला आहे. एका समूहात १८ ते ६० वर्षे वयोगटातील व्यक्तींचा समावेश असेल. तिसऱ्या टप्प्यात लसीची सुरक्षितता आणि प्रतिकार शक्तीची तपासणी होईल.

बातम्या आणखी आहेत...