आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Uttarakhand Chamoli Joshimath; Joshimath Landslide Update | Uttarakhand Cm Pushkar Singh Dhami | Uttarakhand

जोशीमठमधील 55 कुटुंबं रेस्क्यू:CM धामींसमोर रहिवाशांनी मांडल्या व्यथा, महिला म्हणाल्या- डोळ्यासमोर आमचं जग उद्ध्वस्त

21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तराखंडमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जोशीमठमध्ये अनेक ठिकाणी जमीन खचत आहे. शेकडो घरांना तडे गेले आहेत. घरे कधीही कोसळू शकतात, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. जोशीमठच्या लोकांमध्ये प्रचंड भीती आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी जोशीमठला भेट दिली. तेव्हा येथील रहिवाशांनी आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. मुख्यमंत्री धामींसमोर नागरिक ओक्साबोक्शी रडायला लागले. डोळ्यासमोर आमचे जग उद्ध्वस्त होते आहे, हे वाचवा. आम्हाला आमच्या घरात राहण्याची भीती वाटते, अशी व्यथा महिलांनी मुख्यमंत्र्यांकडे मांडली.

मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडताना अनियंत्रित झालेल्यांना सुरक्षा कर्मचार्‍यांनाही हाताळणे कठीण गेले. यावेळी जोशीमठच्या रहिवाशांचे अश्रू पुसत उत्तराखंड सरकार प्रत्येक अडचणीत त्यांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांना त्यांना दिले. धामी यांनी जोशीमठमधील धोक्याच्या क्षेत्रात बांधलेली घरे तातडीने रिकामी करण्यास सांगितले. जोशीमठच्या 9 वॉर्डातील 603 इमारतींमध्ये आतापर्यंत भेगा पडल्या आहेत. 55 कुटुंबांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेण्यात आल्याची माहिती यचमोली जिल्हा प्रशासनाने दिली.

सीएम धामी यांनी जोशीमठच्या रहिवाशांची भेट घेतली

शंकराचार्यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली
ज्योतिषपीठाचे शंकराचार्य जगद्गुरू स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. गेल्या एक वर्षापासून जमीन खचण्याची चिन्हे होती. सरकारने याकडे लक्ष दिले नाही. ऐतिहासिक, पौराणिक आणि सांस्कृतिक शहर जोशीमठ धोक्यात आले आहे, असे त्यात म्हटले.

जुन्या हिमनदीवर वसलेले जोशीमठ
उत्तराखंडचा जोशीमठ बुडत आहे. येथील 561 घरांना तडे गेले आहेत. 4,677 चौरस किमी परिसरात पसरलेल्या सुमारे 600 कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. सुमारे 5 हजार लोक दहशतीत आहेत. घर कधीही कोसळण्याची भीती आहे. याचा सर्वाधिक परिणाम शहरातील रविग्राम, गांधीनगर आणि सुनील वॉर्डात झाला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 13 वर्षांपूर्वी जोशीमठच्या घरांमध्ये भेगा पडू लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यावर एनटीपीसी पॉवर प्रोजेक्ट आणि चार धाम ऑल वेदर रोडवरील काम थांबवण्याचे आदेश देण्यात आले. शहराखालून ब्लास्टिंग आणि बोगद्यांमुळे डोंगर कोसळत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ती त्वरित थांबवली नाही तर शहर भंगारात बदलू शकते.

हिमालयाच्या इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये स्थित, जोशीमठ शहर हे बद्रीनाथ, हेमकुंड आणि फुलांच्या खोऱ्यात प्रवेश करण्याचे ठिकाण मानले जाते. अशा परिस्थितीत जोशीमठमधील परिस्थिती संवेदनशील का आहे, हे जाणून घेणे आवश्यक आहे. जोशीमठच्या भूगर्भीय स्थानावर प्रसिद्ध झालेले अहवाल हे शहर इतके अस्थिर का आहे, हे स्पष्ट करतात. त्यांना क्रमाने समजून घेऊया...

1. वाडिया संस्थेचा अहवाल - जोशीमठ हिमनदीच्या ढिगाऱ्यावर वसलेले
वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजीने आपल्या संशोधनात म्हटले आहे की, उत्तराखंडच्या उच्च उंचीच्या भागात येणारी बहुतेक गावे हिमनदीवर वसलेली आहेत. आज जिथे वस्ती आहे तिथे एकेकाळी हिमनद्या होत्या. या हिमनद्यांवर लाखो टन खडक आणि माती साचली आहे. लाखो वर्षांनंतर हिमनदीचा बर्फ वितळतो आणि मातीचा डोंगर बनतो.

2. एमसी मिश्रा समितीने सांगितले होते की, जोशीमठाखाली माती आणि दगडांचे ढीग
1976 मध्ये गढवालचे तत्कालीन आयुक्त एमसी मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीने सांगितले होते की, जोशीमठचा परिसर प्राचीन भूस्खलन क्षेत्रात येतो. हे शहर डोंगरावरून खाली आलेल्या खडकाच्या आणि मातीच्या ढिगाऱ्यावर बांधले गेले आहे, जे अतिशय अस्थिर आहे.

या भागातील उतारावर खोदकाम करून किंवा ब्लास्टिंगकरून मोठा दगड न काढण्याची शिफारस समितीने केली होती. जोशीमठच्या पाच किलोमीटर परिसरात कोणतेही बांधकाम साहित्य टाकू नये, असेही सांगण्यात आले.

3. हिमालयातील पॅरा-ग्लेशियल झोनच्या हिवाळी बर्फाच्या रेषेवरील वसाहती
हिमालयाच्या प्रदेशात जोशीमठ ज्या उंचीवर आहे, त्याला पॅरा ग्लेशियल झोन म्हणतात. याचा अर्थ या ठिकाणी एकेकाळी हिमनद्या होत्या. पण नंतर हिमनद्या वितळल्या आणि त्यांचा ढिगारा तसाच राहिला. त्यापासून बनलेल्या पर्वताला मोरेन (हिमनगासोबत येणारी माती) म्हणतात. वैज्ञानिक भाषेत अशा जागेला डिस-इक्विलिब्रियम (disequilibrium म्हणतात. याचा अर्थ - अशी जागा जिथे जमीन स्थिर नाही आणि ज्याचे संतुलन स्थापित केले गेले नाही.

जोशीमठ हिवाळ्यातील बर्फाच्या रेषेच्या उंचीपेक्षा जास्त आहे. हिवाळ्यातील बर्फाची रेषा म्हणजे हिवाळ्यात बर्फ किती प्रमाणात राहतो. अशा परिस्थितीतही बर्फाच्या वरती मलबा साचत राहिल्यास तेथे मोरेन तयार होते.

शहराची लोकसंख्या वाढल्याने वनक्षेत्र दोन हजार फुटांनी घटले
मिश्रा समितीने आपल्या अहवालात या विकासामुळे जोशीमठ परिसरात असलेली जंगले नष्ट झाल्याचे म्हटले होते. पर्वतांचे खडकाळ उतार उघडे आणि झाडे नसलेले आहेत. जोशीमठ सुमारे 6,000 फूट उंचीवर वसलेले आहे. परंतु वस्ती वाढल्यामुळे जंगलाचे आच्छादन 8,000 फुटांपर्यंत सरकले आहे. झाडांअभावी धूप आणि लँड स्लाइडिंग वाढले आहे. या दरम्यान, मोठे दगड सरकण्यापासून रोखण्यासाठी एकही जंगल शिल्लक नाही.

स्फोट आणि बांधकामामुळे मोरेन सरकण्यामध्ये वाढ
वाडिया इन्स्टिट्यूटने आपल्या अहवालात मोरेन पर्वताचे सरकणे ठराविक वेळेनंतर निश्चित केले असल्याचे आढळून आले होते. मात्र, अंदाधुंद बॉम्बस्फोट आणि बेशिस्त बांधकामामुळे त्याचा वेग वाढला आहे. त्याचवेळी तेथील शास्त्रज्ञांनी सांगितले होते की, जोशीमठ शहराच्या खाली एका बाजूला धौली गंगा आणि दुसऱ्या बाजूला अलकनंदा नदी आहे. दोन्ही नद्यांनी डोंगराची धूप केल्याने डोंगरही कमकुवत झाला आहे.

प्रकल्पांवर बंदी असतानाही मोठमोठी यंत्रे डोंगर खोदत आहेत
एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाचा 16 किमी लांबीचा बोगदा जोशीमठमधून जात आहे. मलबा आत गेल्यानंतर हा बोगदा बंद करण्यात आला आहे. शास्त्रज्ञ म्हणतात की जेव्हा बोगद्यात वायू तयार होतो, तेव्हा ते निर्माण झालेला दाब मातीला अस्थिर करत आहे. त्यामुळे जमीन खचत आहे.

परिस्थिती चिघळली तेव्हा सरकारने एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्प आणि चार धाम ऑल-वेदर रोड (हेलंग-मारवाडी बायपास) या बोगद्याचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते. मात्र कुठे हे काम कागदावरच थांबले असले तरी जागेवरच मोठमोठी मशिन सुरूच आहेत. डोंगर खोदले जात आहे.

जोशीमठचे अस्तित्व नाहीसे होऊ शकते
जोशीमठ अलकनंदा नदीच्या दिशेने सरकत असल्याचे भूवैज्ञानिकांचे म्हणणे आहे. त्यात आर्मी ब्रिगेड, गढवाल स्काउट्स आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची बटालियन देखील आहे. ताबडतोब प्रभावी पावले उचलली नाहीत, तर मोठी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते, असा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. यातच जोशीमठचे अस्तित्व पुसले जाऊ शकते.

विस्थापितांना आर्थिक मदत
जोशीमठमधील 561 घरांना तडे गेले आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी आणि तज्ज्ञांच्या पथकाने जोशीमठमधील बाधित भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण सुरू केले. धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या 600 कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या होत्या. सीएम रिलीफ फंडातून त्यांना 6 महिन्यांचे भाडे म्हणून दरमहा 4,000 रुपये दिले जातील.

फोटो जोशीमठ येथील शेल्टर होमचा आहे. भीतीने लोक घराबाहेर पडले.
फोटो जोशीमठ येथील शेल्टर होमचा आहे. भीतीने लोक घराबाहेर पडले.
बातम्या आणखी आहेत...