आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तराखंडच्या जोशी मठ भागात जमीन खचली जात आहे. त्यामुळे 561 घरांना तडे गेले आहेत. असे असताना देखील एनटीपीसीच्या जलविद्युत प्रकल्पाच्या बोगद्याचे आणि चार धाम ऑल-वेदर रोडचे (हेलंग-मारवाडी बायपास) काम अद्याप थांबलेले नाही.
सरकारने त्यांच्यावर तत्काळ बंदी घातली असताना ही अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे. विशेष म्हणजे कागदोपत्री काम थांबविले गेल्याचे सांगण्यात आले. मात्र, घटनास्थळावर मात्र, मोठमोठी मशिन सातत्याने डोंगर खोदण्याचे काम करित आहेत.
जोशीमठमध्ये भूजल गळती सातत्याने होत आहे. त्यामुळे येथील परिस्थिती बिकट झालेली आहे. सुमारे 50 हजार लोकसंख्या असलेल्या या शहरात दिवस कसाबसा निघून जातो. पण रात्र काळाची ठरते आहे. धक्कादायक म्हणजे भीतीने कडाक्याच्या थंडीत देखील लोकांना घराबाहेर राहावे लागत आहे. घर कधीही कोसळण्याची भीती त्या लोकांना लागली आहे. जोशीमठच्या रविग्राम, गांधीनगर आणि सुनील वॉर्डात याचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. हे शहर 4,677 चौरस किमीमध्ये पसरलेले आहे.
आजचे मोठे अपडेट्स
6 महिन्यांचे घरांचे भाडे देणार राज्यसरकार
उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी हे आज शनिवारी जोशीमठला भेट देणार आहेत. धामी यांनी शुक्रवारी एका उच्चस्तरीय बैठकीत धोक्याचे क्षेत्र तातडीने रिकामे करण्याचे आणि बाधित कुटुंबांसाठी सुरक्षित ठिकाणी मोठे पुनर्वसन केंद्र बांधण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर धोकादायक घरांमध्ये राहणाऱ्या 600 कुटुंबांना तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
ज्या कुटुंबांची घरे राहण्यास योग्य नाहीत किंवा खराब झालेली आहेत. अशा कुटुंबांना सरकारने भाड्याच्या घरात जाण्यास सांगितले आहे. सरकार त्यांना दरमहा 4 हजार रुपये भाडे देणार आहे. ही रक्कम सीएम रिलीफ फंडातून पुढील 6 महिन्यांसाठी दिली जाणार आहे.
फोटोतून पाहा जोशीमठमधील परिस्थिती
जमीन खचल्याने काय होत आहे?
घरांच्या भींतींना भेगा दिसल्या :
जोशीमठ अलकनंदा नदीकडे सरकत आहे. JD कडे आर्मी ब्रिगेड, गढवाल स्काउट्स आणि इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांची बटालियन देखील आहे. जोशीमठचे अस्तित्व पुसले जाऊ शकते : निर्णायक पावले तातडीने न उचलल्यास मोठा अनर्थ घडू शकतो, असा इशारा भूवैज्ञानिकांनी दिला आहे. जोशीमठचे अस्तित्व पुसले जाऊ शकते.
रविग्राम प्रभागातील घरांना सर्वाधिक तडे :
जोशीमठमध्ये एकूण ५६१ घरे व दुकानांना तडे गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये रविग्राम प्रभागातील 153 घरांना सर्वाधिक फटका बसला आहे. गांधीनगर वॉर्डात 127, मारवाडी वॉर्डात 28, लोअर बाजार वॉर्डात 24, सिंहधर वॉर्डात 52, मनोहर बाग वॉर्डात 71, वरचा बाजार वॉर्डात 29, सुनील वॉर्डात 27 आणि परसरी वॉर्डात 50 घरे आणि दुकानांमध्ये तडे गेले आहेत.
यासंबंधित अन्य बातम्या वाचा
निसर्गाची शिक्षा : जोशीमठ येथील घरांना तडे, आता गळतीही
धार्मिक, संपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.