आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ट्रम्प समर्थकांच्या धमकीमुळे पत्रकार जिम यांना ठेवावा लागला बॉडीगार्ड, बोचरे प्रश्न विचारणाऱ्या दातेंकडे दुर्लक्ष करतात ट्रम्प

न्यूयॉर्क (मोहंमद अली)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमेरिकेतील तीन पत्रकार... ज्यांच्या प्रश्नांवर ट्रम्प यांची बोलती बंद, अनेकदा वाद

अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचा कार्यकाळ माध्यमांसोबतच्या खराब संबंधांमुळे संस्मरणीय हाेत आहे. पत्रकारांच्या बोचऱ्या प्रश्नांमुळे ट्रम्प यांनी अनेकदा प्रेस सोडली आहे. कॅमेऱ्यासमोर प्रश्न न ऐकल्याचा देखावा केला. मीडिया व पत्रकारांना ‘शत्रू’ संबोधले. सीएनएनचे जिम अकोस्टा यांना ट्रम्प समर्थकांकडून जिवे मारण्याची धमक्याही आल्या होत्या. सीएनएनने ट्रम्प यांची रॅली कव्हर करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षा रक्षक ठेवले. अशाच तीन पत्रकारांशी भास्करने बातचीत केली...

सत्याला घाबरतात ट्रम्प, कोरोनाचा सामना करण्याची पद्धत चुकीची
फॉक्स न्यूजचे वॉलेस यांनी जुलैत ट्रम्प यांची मुलाखत घेतली. ते सतत प्रश्न करत होते व ट्रम्पना उत्तर देता येत नव्हते. कोरोनाचा सामना करण्याच्या त्यांच्या पद्धतीबाबत प्रश्नावर अवस्था बघण्यासारखी होती. ख्रिस सांगतात, ते डॉ. फॉसीसारख्या वैद्यकीय अधिकाऱ्याशी भांडत आहेत. ही योग्य पद्धत नाही. ते सत्याला घाबरतात.

माझ्यामुळे त्यांची प्रतिमा खराब झाल्याचे ट्रम्प यांना वाटते
हफिंग्टन पोस्टचे शिरीष दाते यांनी ट्रम्प यांना विचारले होते, तुम्ही एवढे खोटे बोलला आहात, साडेतीन वर्षांनी त्यावर पश्चात्ताप आहे? उत्तर न देताच ते दुसरीकडे बघू लागले. दाते सांगतात, माझे पुस्तक ‘द युजफुल इडियट : हाऊ डोनाल्ड ट्रम्प किल्ड द रिपब्लिकन पार्टी विथ रेसिझम अँड कोरोना व्हायरस’ मुळे त्यांची प्रतिमा खराब झाल्याचे त्यांना वाटते.

राग आल्याने ट्रम्प यांनी सीएनएनला ‘लोकांचे शत्रू’ म्हटले

सीएनएनचे जिम अकोस्टा यांनी २०१८ मध्ये ट्रम्प यांना विचारले, त्यांनी स्थलांतरित गटांना आक्रमणकर्ते का म्हटले? जे अमेरिकी सीमेपासून काहीशे किलोमीटर लांब आहेत. ट्रम्प यांनी जिम व सीएनएनला ‘लोकांचे शत्रू’ म्हटले. असेही म्हणाले की, मला देश चालवू द्या व स्वत: सीएनएन चालवा. यानंतर जिम यांना धमक्या मिळू लागल्या.