आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालमध्ये भाजप नेत्यांवर हल्ला:भाजपाध्यक्षांच्या ताफ्यावर तृणमूल कार्यकर्त्यांकडून दगडफेक; जेपी नड्डा थोडक्यात बचावले, तर कैलाश विजयवर्गीय जखमी

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बंगाल भाजपाध्यक्षांनी अमित शाहना पत्र लिहीले

पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर गेलेल्या भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर गुरुवारी तृणमूल (TMC)च्या कार्यकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली आहे. नड्डा कोलकातावरुन डायमंड हार्बर शहराकडे जात होते, यावेळी त्यांच्यावर हल्ला झाला. दरम्यान, नड्डांच्या सुरक्षेप्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाने ममता सरकारकडून रिपोर्ट मागितली आहे.

कैलाश विजयवर्गीय जखमी

नड्डा यांच्यासोबत असलेल्या भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. यादरम्यान एक मोठा दगड त्यांच्या गाडीचा काच फोडून अंगावर आला आणि यात विजयवर्गीय जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत मुकूल रॉय यांनादेखील मार लागला आहे.

बंगाल भाजपाध्यक्षांनी अमित शाहना पत्र लिहीले

पश्चिम बंगालचे भाजपाध्यक्ष दिलीप घोष यांनी राज्य सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांना पत्र लिहीले आहे. घोष यांनी सांगितले की, बुधवारी नड्डा यांच्या कार्यक्रमात पोलिसांचा बंदोबस्त नव्हता. राज्य सरकारकडून नड्डा यांच्या सुरक्षेत मोठी चुक झाली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser