आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • JP Nadda Kailash Vijayvargiya Convoys Attacked In West Bengal | Governor Jagdeep Dhankhar On Mamata Banerjee

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बंगालमध्ये भाजप नेत्यांवर हल्ले:राज्यपाल जगदीप धनखड ममता बॅनर्जींना म्हणाले- आग से मत खेलो, यह बहस छोड़नी होगी कि कौन भीतरी और कौन बाहरी

कोलकाताएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'मुख्यमंत्र्यांनी संविधानाचे पालन करावे'

पश्चिम बंगालमध्ये मोठी उलथापालथ होण्याचे संकेत मिळत आहेत. काल भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि कैलाश विजयवर्गीय यांच्यावर तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. यात विजयवर्गीय जखमी झाले होते. यानंतर आता आज बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी माध्यमांसमोर येऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, त्यांनी ममता यांना 'आगीशी खेळू नका', असा इशाराही दिला.

'मुख्यमंत्र्यांनी संविधानाचे पालन करावे'

राज्यपाल धनखड म्हणाले की, काल जी घटना घडली, ती अतिशय निंदनीय आहे. ती घटना म्हणजे, लोकशाहीवर मोठा कलंक आहे. मुख्यमंत्री ममता बनर्जींनी संविधानाचे पालन करावे. त्यांनी आपली जबाबदारी समजून झालेल्या घटनेवर माफी मागावी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser