आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JP Nadda Letter To Sonia Gandhi; BJP Chief On Congress Leaders Amid Coronavirus Second Wave; News And Live Updates

मोदींवरील टीकेवरुन सोनिया गांधींना उत्तर:नड्डा म्हणाले - कॉंग्रेसच्या कृत्याने मी दु:खी; एकीकडे देश महामारीविरुद्ध लढत असून यांचे वरिष्ठ नेते भ्रम पसरवत आहे

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 4 दिवसांपूर्वी सोनिया म्हणाल्या - व्यवस्था नाही, मोदी सरकार अपयशी

कोरोना व्यवस्थापनावर काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मोदी सरकारला घेरले आहे. याचे प्रत्युत्तर म्हणून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मंगळवारी सोनिया गाधी यांना पत्र लिहले आहे. पत्रात म्हटले की, मी काँग्रेसच्या कृत्याने आश्चर्यचकित झालो नसून मला याचे दु:ख झाले आहे. कारण एकीकडे काँग्रेस पक्षातील काही सदस्य कोरोना काळात लोकांसाठी मदत करत आहे.

तर दुसरीकडे याच पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नकारात्मकतेमुळे त्यांचे काम डागाळत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, देशात कोराना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस वाढत आहे. याला रोखण्यासाठी देश महामारीविरुद्ध लढत आहे. पण याकाळात काँग्रेस संभ्रम पसरवत असल्याचे त्यांनी सांगितले.

मोदींनी चुकांसाठी प्रायश्चित करावे - सीडब्ल्यूसी

सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्षाच्या सीडब्लूसी बैठकीत मोदी सरकार कोरोना काळात अपयशी ठरल्याचा टोला लगावला होता. दरम्यान, या बैठकीत सीडब्ल्यूसीने केंद्र सरकारविरोधात एक ठराव मंजूर केला. त्यामध्ये पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या चुकांसाठी प्रायश्चित करावे असे सांगितले.

नड्डाचे काँग्रेसला पत्र; या प्रश्नांचे दिले उत्तरनेत्यांच्या विधानांवर :
मी हे पत्र अतिशय वेदनादायी आणि दु: खाने लिहित असून यापूर्वी असे पत्र कधीच लिहिले नाही. परंतु ज्या प्रकारे कॉंग्रेसचे सदस्य आणि मुख्यमंत्री संभ्रम पसरवत आहे त्यामुळे मला हे पत्र लिहावे लागत आहे. सध्या संपूर्ण देश कोरोना महामारीविरुद्ध ताकदीने लढत आहे आणि दुसरीकडे कॉंग्रेसचे नेतृत्व जनतेची दिशाभूल करत आहे. त्यामुळे आता त्यांनी ही खोटा प्रचार थांबवला हवा.

लसीकरणावर :
जेंव्हा शास्त्रज्ञ आणि डॉक्टर कोरोनाची लस शोधत होते तेंव्हा काँग्रेसने याचीदेखील थट्टा करण्याचे सोडले नसल्याचे त्यांनी म्हटले. यामध्ये काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यासह मुख्यमंत्र्यांचा समावेश असल्याचे ते म्हणाले. पत्रात पुढे म्हटले की, ज्या देशात लसीबाबत कोणताही संकोच नव्हता. तेथे कॉंग्रेसने शतकानुशतके शंका निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

4 दिवसांपूर्वी सोनिया म्हणाल्या - व्यवस्था नाही, मोदी सरकार अपयशी
काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी 7 मे रोजी केंद्र सरकारावर टोला लगावताना व्यवस्था नाही, मोदी सरकार अपयशी ठरल्याचे म्हटले होते. भारत देशात मजबूत संसाधने आण‍ि सामर्थ आहे. त्यामुळे ही लढाई सरकारविरुद्धची नसून कोरोना महामारीविरुद्धची असल्याचे संसदीय मंडळाच्या व्हर्च्युअल बैठकीत म्हटले होते.

बातम्या आणखी आहेत...