आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JP Nadda's Allegations On Congress In Gujarat | "Congress Never Respected Sardar Patel, But Modi Increased His Respect By Making 'Statue Of Unity'"

जेपी नड्डा यांचा गुजरातमध्ये काँग्रेसवर आरोप:'काँग्रेसने सरदार पटेलांना कधीही आदर दिला नाही, पण मोदींनी 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनवून सन्मान वाढवला'

10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजप अध्यक्ष जेपी नड्डा सध्या गुजरातमध्ये प्रचार करत आहेत. जेपी नड्डा गुजरातमधील शेहरा येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी आपल्या भाषणात काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. तसेच काँग्रेसने सरदार पटेलांना कधीही आदर दिला नाही. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 182 मीटर उंच 'स्टॅच्यू ऑफ युनिटी' बनवून सरदार पटेल यांचा सन्मान वाढवला. तसेच मगरीचे अश्रू ढाळणारे अनेक असतील, सहानुभूती दाखवणारे अनेक असतील, मात्र आदिवासींचे चित्र आणि नशीब बदलण्याचे काम भाजपनेच केले आहे, असे ते म्हणाले.

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी आपल्या भाषणात मोदींनी केलेल्या कामांचा पाढा वाचला. ते म्हणाले, 'पीएम मोदींनी 'आदिवासी गौरव दिवस' साजरा करून आदिवासींचा अभिमान वाढवला आहे. 'राष्ट्रीय आदिवासी संस्था' निर्माण करून आदिवासींचे योगदान पुढे नेले आहे. ओबीसी आयोगाला घटनात्मक दर्जा दिला. आज ‘नॅशनल कमिशन फॉर अदर बॅकवर्ड क्लासेस’च्या माध्यमातून ओबीसी बांधवांची काळजी करण्याचे, त्यांना स्थान देण्याचे आणि त्यांच्या समाजाचा गौरवशाली इतिहास डोळ्यासमोर ठेवून त्यांचे संरक्षण करण्याचे काम भाजप करत आहे. 'आयुष्मान भारत योजने'द्वारे करोडो लोकांना 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देण्यात आले. गुजरातमध्ये 'मुख्यमंत्री अमृत योजने'ची व्याप्ती वाढवून त्यात 48 लाख लोक जोडले गेले आहेत. आमच्या डबल इंजिन सरकारने प्रत्येक गरीबावर उपचाराची व्यवस्था केली आहे.

काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसवर ताशेरे ओढत जेपी नड्डा म्हणाले, 'जवाहरलाल नेहरूंनी एक एम्स उघडली, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी अल्पावधीत सहा एम्स उघडल्या. पीएम मोदींनी 15 एम्स उघडल्या आणि गुजरातमध्येही राजकोटच्या भूमीवर एम्स सुरू केले आहे. या देशात धनुर्वाताचे औषध यायला 25 वर्षे लागली, स्मॉल पॉक्सच्या औषधासाठी 28 वर्षे, क्षयरोगाच्या औषधासाठी 30 वर्षे, जपानी तापाचे औषध यायला 100 वर्षे लागली. पण, पंतप्रधान मोदींना 9 महिन्यांमध्येच कोरोनाच्या 2-2 लसी बनवून भारताला सुरक्षित केले.

1 आणि 5 डिसेंबर रोजी मतदान

राज्यात पहिल्या टप्प्यातील मतदान 1 डिसेंबरला, तर दुसऱ्या टप्प्याचे मतदान 5 डिसेंबरला होणार आहे. त्याचबरोबर दोन्ही टप्प्यातील मतमोजणी 8 डिसेंबरला होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेची राजपत्र अधिसूचना 5 नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी 10 नोव्हेंबरला जारी करण्यात आली. पहिल्या टप्प्यासाठी 15 नोव्हेंबरला छाननी होणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 18 नोव्हेंबर आहे. पहिल्या टप्प्यासाठी 17 नोव्हेंबर आणि दुसऱ्या टप्प्यासाठी 21 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...