आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • JRD's 89 year old Flight Will Resume, Repeating The History Of Climbers Crossing The Atlantic Pacific Ocean Alone

मंडे पॉझिटिव्ह:जेआरडींचे 89 वर्षांपूर्वीचे उड्डाण पुन्हा साकारणार, अटलांटिक-प्रशांत महासागर एकटी ओलांडणारी आरोही इतिहासाची पुनरावृत्ती करणार

भुज9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरातचे भूज विमानतळ १५ ऑक्टोबर (शुक्रवार) रोजी आणखी एका महत्त्वपूर्ण घटनेचे साक्षीदार ठरणार आहे. अटलांटिक आणि प्रशांत महासागर लाइट स्पोर्ट््स एअरक्राफ्टद्वारे (एलएसए) पार करणारी जगातील पहिली वैमानिक आरोही पंडित येथ्ून मुंबईतील जुहू एअरपोर्टकडे विमानाने एकटी उड्डाण घेणार आहे.

विशेष म्हणजे, १९३२ मध्ये याच दिवशी भारतीय नागरी उड्डाण क्षेत्राचे जनक जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाइन्सच्या व्यावसायिक विमानाने पहिल्यांदा कराचीहून मुंबईसाठी यशस्वी उड्डाण पूर्ण केले होते. असा गौरवशाली क्षण दुसऱ्यांदा जीवित करण्यासाठी आरोही त्या उड्डाणाची पुनरावृत्ती करणार आहे. यासाठी इंडियन वुमन पायलट असोसिएशनने पुढाकार घेतला आहे. भूज विमानतळाचे संचालक नवनीतकुमार गुप्तांनी सांगितले की, ८९ वर्षांपूर्वी रचला गेलेला इतिहास जिवंत करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. तथापि, कराची आता पाकिस्तानात असल्याने पाक सीमेपासून जवळ असलेल्या भूज विमानतळाची निवड केली गेली. आरोही अहमदाबाद विमानतळावरून इंधन भरून भूजला येईल. येथून त्याच विमानाने मुंबईकडे उड्डाण करेल, जे विमान टाटांनी वापरले होते.

आरोही ८९ वर्षांपूर्वीच्या मार्गानेच मुंबईला पाेहोचेल. उड्डाणावेळी ती सुमारे ५०० समुद्री मैलाचे अंतर आणि ५ तासांच्या प्रवासासाठी ६० लिटरहून कमी पेट्रोलचा वापर करेल. या वेळी जीपीएस, ऑटो-पायलट किंवा कॉम्प्युटराइज्ड उपकरणांचा वापर अजिबात होणार नाही. जेआरडी टाटांनी असाच विमान प्रवास पूर्ण केला होता. उल्लेखनीय म्हणजे आरोही २०१९ मध्ये एलएसएद्वारे अटलांटिक आणि प्रशांत महासागर पार करणारी जगातील पहिली महिला वैमानिक आहे. या अभियानात सहभागी सुमेरू एव्हिएशनचे मेहुल जोशी यांनी सांगितले की, आरोही ११ ऑक्टोबरला भूजला पोहोचेल. दुसऱ्या दिवशी ट्रायल उड्डाण घेईल. तर टाटा समूहाने म्हटले की, ‘या ऐतिहासिक प्रवासाला जिवंत करण्यासाठी आरोही करत असलेल्या प्रयत्नांना पाठबळ देताना आनंद वाटत आहे. ही जेआरडी टाटा यांच्या दृष्टीला खरी श्रद्धांजली आहे.

माधापार गावातील वीरांगनांनाही या उड्डाणाद्वारे सन्मान दिला जाणार
ज्या धावपट्टीवरून आरोही उड्डाण घेणार आहे ती १९७१ च्या युद्धात पाकने उद्ध्वस्त केली होती. तेव्हा माधापारमधील महिलांनी शौर्य दाखवत ७२ तासांतच ती पुन्हा उभारली होती. याच घटनेवर ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ चित्रपट बनला आहे. या उपक्रमाद्वारे धावपट्टी निर्माण करणाऱ्या वीरांगनांंनाही सन्मािनत केले जाईल. ही जागा स्त्रीशक्तीला सार्थक करणाऱ्या आणखी एका घटनेची साक्षीदार ठरणार आहे. आरोही जेआरडी टाटांचा उल्लेख करत लिहिते की, ‘जेव्हा तुम्ही काम करता तेव्हा ते असे करा की सर्वच तुमच्यावर अवलंबून आहेत. जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ती अशी करा की तेव्हा सर्वच ईश्वरावर अवलंबून असतील.

बातम्या आणखी आहेत...