आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वोच्च न्यायालयाचे मत:न्याय अधिकाऱ्यांवर आरोप झाल्यास जज निराश होतात

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या खटल्यात प्रतिकूल आदेश आल्यानंतर न्यायिक अधिकाऱ्यांवर आरोप लावण्याच्या प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयाने टीका केली. न्यायमूर्ती एम.आर. शहा व कृष्ण मुरारी म्हणाले, असे प्रकार सुरूच राहिल्यास न्यायाधीश निरुत्साही होतील. राजस्थानच्या धौलपूरच्या न्यायालयातील प्रलंबित प्रकरणाला उत्तर प्रदेशातील नोएडा येथे स्थलांतरित करण्याची याचिका पीठाने फेटाळून लावली. तेव्हा पीठाने ही टिप्पणी केली. कोर्ट म्हणाले, सुनावणी नि:पक्ष होत नसल्याचा दावा या खटल्यातून करण्यात आला होता. एखादा आदेश वादीच्या विरोधात असल्यास न्यायालयावर कुणाचा तरी प्रभाव आहे, असे म्हणता येत नाही.

न्यायसंस्थांत महिलांची संख्या आता वाढेल : भविष्यात न्यायपालिकेत महिलांची संख्या वाढेल, असे देशाचे सरन्यायाधीश उदय लळीत यांनी म्हटले आहे. ते शनिवारी एका समारंभात बोलत होते. विधी महाविद्यालयांत ‘अधिनिर्णय’ हा विषय समाविष्ट करण्यात यावा. त्यामुळे अशा संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या तरुण वकिलांच्या प्रतिभेचे पोषण करण्यास मदत होईल, असा सल्लाही त्यांनी दिला. हा विषय काही विधी विद्यापीठांत समाविष्ट करण्यात आला आहे. देशात अनेक क्षेत्रांत आता महिला मोठ्या संख्येने आपली क्षमता सिद्ध करू लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...