आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगाडचा जमाना:OTT प्लॅटफॉर्मच्या पासवर्डसाठी सुरू झाले स्टार्टअप; अर्धी किंमत, तासांच्या हिशेबाने देताहेत सबस्क्रिप्शन

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओटीटी प्लॅटफाॅर्मशी संबंधित लोक पासवर्डची किंमत चांगल्या प्रकारे जाणतात. मासिक सबस्क्रिप्शनच्या शुल्कापासून वाचण्यासाठी एक पासवर्ड अनेक लोकांसोबत शअर केला जातो. एक पासवर्ड कुटुंबात काका, मावशीपासून ते आत्यापर्यंत फिरतो. ‘कौटुंबिक मित्रा’पर्यंतही पोहोचतो. पासवर्ड शेअरिंगमुळे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म तोटा सहन करत आहेत. नेटफ्लिक्सने सांगितले की, जानेवारी-मार्च २०२२ मध्ये जगभरात २ लाख सबस्क्रायबर घटले. असे एका दशकात पहिल्यांदाच झाले. जगभरातील नेटफ्लिक्सचे २२.२ कोटी सबस्क्रायबर अन्य १० कोटी लोकांना पासवर्ड शेअर करत असल्याचा अंदाज आहे. पासवर्ड मिळवणे व शुल्क न भरण्यामुळे देशात अनेक नवे उद्योग व स्टार्टअप उभे राहिले आहेत. हे स्टार्टअप किरकोळ किमतीत पासवर्ड उपलब्ध करून देत आहेत. दिल्लीचा एक साॅफ्टवेअर इंजिनिअर अर्ध्या किमतीत ओटीटी सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देतो. वेगवेगळ्या वेळी प्लॅटफॉर्मवर चित्रपट किंवा सिरीज पाहणाऱ्या ५-१० लोकांना एक पासवर्ड विकला जातो. दिल्लीत असे शेकडो रिसेलर आहेत. ते कमी किमतीत ओटीटी सबस्क्रिप्शन उपलब्ध करून देतात. अशाच प्रकारे अनेक लोक टेलिग्राम व इन्स्टाग्रामवरही सबस्क्रिप्शन पासवर्ड विकण्याचा व्यवसाय करत आहेत. दिल्ली सरकारच्या मार्चमध्ये झालेल्या बिझनेस ब्लास्टर कार्यक्रमात बारावीच्या ४-५ विद्यार्थ्यांनी ‘ओटीटी हब’ आयडिया सादर केली होती. जे लोक एक किंवा दोन चित्रपट पाहू इच्छितात त्यांच्यासाठी ताशी ५ रुपये या हिशेबाने स्टार्टअपची योजना आहे. शेअरिंग समस्येपासून बचाव करण्यासाठी नेटफ्लिक्सने मार्चमध्ये तीन लॅटिन अमेरिकन देशांत नवे धोरण आणले. पासवर्ड शेअर केल्यास त्यांनी शुल्क आकारले. त्यावर युजरने सबस्क्रिप्शन रद्द केले. घराबाहेर पासवर्ड शेअर करता येणार नाही, असे प्लॅटफॉर्मने ठरवले.

टेलिकॉम कंपन्या देताहेत एका प्लॅनवर अनेक ओटीटीचे सबस्क्रिप्शन
देशात सध्या ५५ पेक्षा जास्त व्हिडिओ एंटरटेनमेंट अॅप सुरू आहेत. यांची संख्या सातत्याने वाढत आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मची वाढती मागणी व एकापेक्षा जास्त ओटीटी प्लॅटफाॅर्मचे सबस्क्रिप्शन घेण्याची समस्या पाहता टाटा प्ले, एअरटेल आदी कंपन्यांनी नवे सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले आहेत. याद्वारे अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मच्या सेवा घेता येतात.

भारतात अॅक्टिव्ह पेड सबस्क्रायबर
डिस्ने हॉटस्टार ३.४५ कोटी
अॅमेझॉन प्राइम १.९७ कोटी
झी५ ०.६५ कोटी
नेटफ्लिक्स ०.५४ कोटी
सोनीलिव्ह ०.४६ कोटी

बातम्या आणखी आहेत...