आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
गुरू आणि शनी हे सौर यंत्रणेतील सर्वात मोठे ग्रह, ३९७ वर्षांनंतर आकाशात एकमेकांना स्पर्श करताना बघायला मिळतील. हा योगायोग २१ डिसेंबर रोजी पाहायला मिळेल. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, या दुर्मिळ घटनेत या दोघांमधील आभासी अंतर केवळ ०.०६ अंश असेल. या दोन्ही चंद्रांना एक डिग्री अंतराने पाहण्याची संधी मिळेल. असा योग नंतर ३७६ वर्षांनंतर येईल. आपण सध्या खुल्या डोळ्यांनी शनी आणि गुरुला आकाशात पाहू शकतो. शनी चांदीच्या रंगाच्या रिंग्जमध्ये गुंडाळलेला असून त्याचे टायटन आणि रे हे उपग्रहही दिसतील. गुरुचे ४ उपग्रह गायनामिड, कॅलेस्टो, आयओ व युरोपा हेदेखील या वेळी खगाेलप्रेमींना बघायला मिळणार आहेत.
पहिल्यांदा गॅलिलियो यांनी पाहिली होती ही घटना : महान शास्त्रज्ञ गॅलिलियो गॅलिली यांनी टेलिस्कोप बनवल्यावा १६२३ मध्ये शनी व गुरुला इतक्या जवळून पाहिले होते. दुर्बिणीच्या सुविधेच्या उपलब्धतेमुळे, ग्रह आणि नक्षत्रांसह विश्वाच्या अनेक रहस्यमय व दिशाभूल करणाऱ्या वस्तुस्थितीची सत्यता कळाली. या घटनेची रोचकता आणखीन वाढली आहे कारण ही खगोलशास्त्रीय घटना वर्षाच्या सर्वात छोट्या दिवशी होणार आहे. शास्त्रज्ञांनी या दुर्मिळ घटनेला ‘ग्रेट कंजेक्शन’ असे नाव दिले आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.