आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Justice Chandrachud Said For The First Time In Delhi, He Saw So Many Stars And Saw The Swarm Of Mares; Prosecutors Said The Lock Down Should Remain Until July

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिल्ली:न्या. चंद्रचूड म्हणाले - दिल्लीत पहिल्यांदाच रात्री इतके तारे बघितले, माेरांचा थवाही पाहिला; वकील म्हणाले, लाॅकडाऊन जुलैपर्यंत राहावे

नवी दिल्लीएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • दिव्य मराठी विशेष : सर्वाेच्च न्यायालयात सुनावणीच्या वेळी रंगली लाॅकडाऊनमधल्या बदलत्या वातावरणाची चर्चा

पवनकुमार

लॉकडाऊनमुळे देशाच्या पर्यावरणात बऱ्यापैकी सुधारणा झाली अाहे. सर्वाेच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांंनी साेमवारी सुनावणीच्या वेळी व्हिडिअाे काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून पर्यावरण बदलांचे अापले अनुभव वकिलांपुढे मांडले. ते म्हणाले, “लॉकडाऊनपूर्वी वातावरण बरेचसे प्रदूषित हाेते. पण अाता त्यात बदल झाला अाहे. मी रात्री अाकाशात अनेक तारे पाहू शकलाे. माझ्या दिल्लीच्या इतक्या वर्षांच्या वास्तव्यात असे पहिल्यांदाच घडले.  घरासमाेरच्या बागेत माेरांचे थवे अवतरणे हे मनाला वेगळी अनुभूती देणारे क्षण अाहेत. 

व्हिडिअाे काॅन्फरन्सिंग सुनावणीत तांत्रिक त्रुटी असल्याचे वकील एन.डी. राव म्हणाले, लाॅकडाऊनमुळे सर्वकाही बदलले. अापल्या कामाची पद्धत तर बदललीच, पण  देशभरातील प्रदूषणाची समस्याही संपली. हा लाॅकडाऊन जर जुलैपर्यंत कायम राहू शकला असता तर... 

न्या. डी.वाय चंद्रचूड म्हणाले, निसर्गावर लाॅकडाऊनचा खूप चांगला परिणाम झाला अाहे. निसर्ग स्वत:च स्वत:मध्ये बदल घडवत असल्याचे संदेश साेशल मीडियावर मिळत अाहेत. यमुना पुन्हा निर्मळ हाेऊन वाहू लागली अाहे, गंगेचे पाणीही स्वच्छ झाले असून त्यातील अाॅक्सिजनचे प्रमाण वाढत अाहे. इतकी वर्षे खूप खर्च करून जे शक्य झाले नाही ते लाॅकडाऊनमुळे जमले. नंतर चंद्रचूड यांनी चर्चा अावरती घेऊन निकाल सुनावला.

गंगा अाणि यमुनेतील पाण्याची गुणवत्ता अाणि पीएचची पातळी सुधारली

लाॅकडाऊनमुळे गंगा व यमुनेचे प्रदूषण बऱ्याच प्रमाणात कमी झाले अाहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण महामंडळानुसार अाैद्याेगिक कचरा कमी झाल्याने रिअल टाइम वाॅटर माॅनिटरिंगमध्ये अाॅक्सिजन मिसळण्याचे प्रमाण प्रतिलिटर ६ एमजीपेक्षा जास्त, जैवरसायन अाॅक्सिजनची मागणी प्रतिलिटर २ एमजी अाणि काॅलिफाॅर्मची एकूण पातळी प्रति १०० एमएल ५,००० झाली अाहे. याशिवाय गंगा अाणि तिच्या पूरक नद्यांमध्ये पीएचचे प्रमाणही सुधारलेले अाहे.

लाॅकडाऊनमध्ये निसर्गाला कसा मिळाला दिलासा

वायू प्रदूषण.........                   
               

शहर  २१ मार्च    १३ एप्रिल    
दिल्ली192126
मुंबई    7660
कोलकाता    6356
चेन्नई6244

ध्वनी प्रदूषण : ४ महानगरांतल्या ध्वनी प्रदूषणाचा निर्धारित निर्देशांक ५५ डेसिबलच्या तुलनेत ३३ झाला.

बातम्या आणखी आहेत...