आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Justice NV Ramana Takes Charge As Chief Justice, President Ramnath Kovind Administered The Oath

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताला मिळाले 48 वे CJI:​​​​​​​न्यायमूर्ती एन.व्ही. रमना यांनी सरन्यायाधीशपदाचा कार्यभार स्वीकारला, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिली शपथ

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले असे न्यायाधीश जे CJI बनले

न्यायमूर्ती एन.व्ही. रमना यांनी देशाचे 48 वे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी त्यांना शपथ दिली. जस्टिस रमना यांनी CJI एसए बोबडे यांची जागा घेतली आहे. न्यायमूर्ती बोबडे हे 23 एप्रिलला निवृत्त झाले. बोबडे यांनीच न्यायमूर्ती रमना यांच्या नावाचा प्रस्ताव राष्ट्रपतींना पाठवला होता.

आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे पहिले असे न्यायाधीश जे CJI बनले
न्यायमूर्ती रमना आंध्र प्रदेश हायकोर्टाचे पहिले असे जज आहेत, जे CJI बनले आहेत. जस्टिस रमना 26 ऑगस्ट 2022 निवृत्त होतील. म्हणजेच त्यांचा कार्यकाळ दोन वर्षांपेक्षा कमी राहिला आहे. नोव्हेंबर 2019 मध्ये न्यायमूर्ती बोबडे यांनी 47 वे सीजेआयच्या रुपात शपथ घेतली होती. जस्टिस रंजन गोगोई यांच्या निवृत्तीनंतर जस्टिस बोबडे यांना CJI बनवण्यात आले होते.

1983 मध्ये जस्टिस रमना यांनी वकिलीला सुरुवात केली
जस्टिस रमना यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 ला आंध्रप्रदेशच्या कृष्णा जिल्ह्याचे पोन्नवरम गावात झाला होता. 10 फेब्रुवारी 1983 ला त्यांनी वकिलीची सुरुवात केली. 27 जून 2000 रोजी त्यांची आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली. न्यायमूर्ती रमना यांची फेब्रुवारी 2014 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. 10 फेब्रुवारी 1983 रोजी त्यांनी वकिलीसह आपल्या कारकीर्दीची सुरूवात केली.

या तीन ऐतिहासिक निर्णयांमध्ये होते जस्टिस रमना

  1. न्यायमूर्ती रमना यांनी 10 जानेवारी 2020 ला जम्मू-कश्मीरमध्ये इंटरनेट निलंबनावर तत्काळ समिक्षा करण्याचा निर्णय दिला होता.
  2. 13 नोव्हेंबर 2019 रोजी सीटीआयचे कार्यालय आरटीआयच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतलेल्या ऐतिहासिक खंडपीठातही त्यांचा समावेश होता.
  3. जानेवारी 2021 मध्ये जस्टिस रमना आणि जस्टिस सूर्यकांत यांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की घरगुती महिलेच्या कामाची किंमत ही तिच्या ऑफिसमध्ये जाणाऱ्या पतीपेक्षा कमी नाही.

बातम्या आणखी आहेत...