आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Justice NV Ramana Update | Justice NV Ramana 48th Chief Justice Of India (CJI), Oath On April 24; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

न्यायमुर्ती रमना होणार नवे मुख्य न्यायाधीश:राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडून मुख्य न्यायाधीशांच्या नियुक्तीवर शिक्कार्मोतब; 25 एप्रिलला होणार शपथविधी

नवी दिल्ली7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे असे न्यायमुर्ती जे मुख्य न्यायाधीश होतील

भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी न्यायमुर्ती एनवी रमना यांची नियुक्ती होणार आहे. ते भारताचे 48 वे मुख्य न्यायाधीश होतील. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यांच्या नियुक्तीला मंजुरी दिली असून ते 24 एप्रिल रोजी आपल्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेणार आहे. सध्या मुख्य न्यायाधीश बोबडे यांच्यानंतर ते सर्वात वरिष्ठ मुख्य न्यायमुर्ती असणार आहे.

आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाचे असे न्यायमुर्ती जे मुख्य न्यायाधीश होतील
न्यायमुर्ती एनवी रमना हे आंध्र प्रदेशाचे पहले असे न्यायमुर्ती असणार आहेत जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी विराजमान होणार आहे. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षापेक्षा कमी असून ते 26 ऑगस्‍ट 2022 ला रिटायर होतील. यापूर्वी मुख्य न्यायाधीश बोबडे यांनी नोव्हेंबर 2019 मध्ये 47 व्या मुख्य न्यायाधीशपदाची शपथ घेतली होती.

न्यायमूर्ती रमना यांनी तीन ऐतिहासिक निर्णय दिले

  • न्यायमुर्ती रमना यांनी जम्मू-काश्मीरमधील इंटरनेटवरील निलंबनाचा आढावा घेण्याचा निकाल 10 जानेवारी 2020 दिला.
  • 13 नोव्हेंबर 2019 रोजी सीजीआयच्या कार्यालयाला आरटीआयच्या कक्षेत आणण्याचा निर्णय घेतलेल्या ऐतिहासिक खंडपीठातही त्यांचा समावेश होता.
  • जानेवारी २०२१ मध्ये न्यायाधीश रमना आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठाने असा निर्णय दिला की घरगुती महिलेच्या कामाची किंमत तीच्या पतीच्या कार्यालयीन कामापेक्षा कमी नाही.
बातम्या आणखी आहेत...