आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करान्यायमूर्ती यू. यू. ललित यांची देशाचे 49 वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती होण्याची दाट शक्यता आहे. विद्यमान सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी कायदे मंत्री किरण रिजीजू यांच्याकडे तशी शिफारस केली आहे. रमणा येत्या 26 ऑगस्ट रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यानंतर 27 ऑगस्ट रोजी ते सीजेआय म्हणून पद व गोपनीयतेची शपथ घेऊ शकतात. रमणांनी गुरूवारी सकाळी स्वतः ललित यांना आपल्या शिफारस पत्राची एक कॉपी सुपूर्द केली.
कायदा मंत्री किरण रिजीजू यांनी बुधवारी रात्री सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा यांना एक पत्र लिहिले. या पत्राद्वारे त्यांनी रमणांना त्यांच्या उत्तराधिकाऱ्याचे नाव सूचवण्याची विनंती केली होती. विद्यमान परंपरेनुसार विद्यमान सरन्यायाधीश कायदा मंत्रालयाच्या विनंतीनुसार आपल्या उत्तराधिकाऱ्याच्या नावाची शिफारस करतात.
ललित 74 दिवसांसाठी होणार CJI
सद्यस्थितीत सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठतम न्यायाधीश असणारे ललित अवघ्या 74 दिवसांसाठी सरन्यायाधीश होतील. त्यानंतर 8 नोव्हेंबर रोजी ते आपल्या पदावरुन सेवानिवृत्त होतील. न्यायमूत्री ललित यांनी जून 1983 मध्ये वकील म्हणून कामास सुरूवात केली. त्यानंतर डिसेंबर 1985 मध्ये त्यांनी बॉम्ब हाय कोर्टात प्रॅक्टीस केली. त्यानंतर ते जानेवारी 1986 मध्ये दिल्लीला आले.
न्या. ललित बारमधून थेट SC च्या खंडपीठात प्रमोट होणारे दुसरे न्यायाधीश
न्यायमूर्ती ललित ललित यांनी 'तीन तलाक' प्रथेला अवैध ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक खटल्यांचा न्यायनिवाडा केला आहे. त्यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती झाली, तर बारमधून थेट सर्वोच्च न्यायालयात पदोन्नती मिळणारे ते दुसरे सरन्यायाधीश ठरतील. यापूर्वी न्यायमूर्ती एस.एम. सीकरी मार्च 1964 मध्ये सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठात थेट बढती मिळणारे पहिले वकील होते. ते जानेवारी 1971 मध्ये 13 वे सरन्यायाधीश बनले होते.
ललित यांची एप्रिल 2004 मध्ये सुप्रीम कोर्टाचे ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुप्रीम कोर्टाच्या आदेशांनुसार टू जी प्रकरणाच्या सुनावणीत विशेष सीबीआय सरकारी वकील म्हणूनही त्यांनी काम केले आहे. न्यायमूर्ती ललित यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या विधी सेवांचे सदस्य म्हणूनही काम केले आहे.
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचे काय?
दुसरीकडे, सरन्यायाधीश रमणा यांच्या नेतृत्वातील त्रिसदस्यीय खंडपीठापुढे महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुरू आहे. त्यावर येत्या सोमवारी सुनावणी होणार आहे. पण रमणा येत्या 28 तारखेला सेवानिवृत्त होणार असल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी नव्या खंडपीठापुढे होणार की रमणाच हे प्रकरण हातावेगळे करुन सेवानिवृत्त होणार? हे पाहणेही या प्रकरणी महत्वाचे ठरणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.