आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jyotiraditya Scindia MLA | Madhya Pradesh By Election 28 Seats Result Update; Jyotiraditya Scindia BJP MLA Leading In 20 Seats

ज्योतिरादित्य शिंदेंचे टेंशन वाढले:मध्यप्रदेशात शिंदेंचा प्रभाव असणाऱ्या 20 मधील 14 जागांवर भाजप आघाडीवर, काँग्रेसला  6 जागांवर बढत

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ग्वालियर-चंबलच्या 16 मध्येही शिंदेंचे 6 समर्थक पिछाडीवर

राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांच्या प्रभावातील 20 मधील 14 जागांवर भाजप उमेदवार आघाडीवर आहे. 6 जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे गेले आहेत. शिंदेसोबत 22 आमदार काँग्रेसचा राजीनामा देत भाजपमध्ये सामिल झाले होते. यामधील 19 शिंदे गटाचे होते. एंदल सिंह कंसाना आणि बिसाहूलाल सिंह दिग्विजय सिंह समर्थक तर हरदीप सिंह दंग अरुण यादव यांचे समर्थक होते. जौरामध्ये बनवारीलाल शर्मांच्या निधनानंतर सीट रिकामे झाले होते. हे सीटही शिंदेंच्या प्रभावातील आहे. आता येथून सूबेदार निवडणूक लढवत आहेत आणि ते आघाडीवर आहेत.

राज्यवर्धन यांना मजबूत बढत
सर्वात जास्त लीड शिवराज सरकारमध्ये मंत्री आणि बदनावरमधील उमेदवार राज्यवर्धन सिंह दत्तीगांव यांची आहे. त्यांना काँग्रेस उमेदवार कमल सिंह पटेलपेक्षा 8334 मते जास्त मिळाली आहेत. पहिल्या राउंडमध्ये लीड घेण्यास दुसऱ्या नंबरवर सांवेरमधून तुलसी सिलावट आहेत, ते काँग्रेसचे प्रेमचंद गुड्डूपेक्षा 5668 वोट पुढे आहेत.

शिंदे समर्थक उमेदवार, जे सध्या आघाडीवर आहेत
राज्यवर्धन सिंह दत्तीगांव, बदनावर
तुलसी सिलावट, सांवेर
डॉ. प्रभुराम चौधरी, सांची
इमरती देवी, डबरा
प्रद्युम्न सिंह तोमर, ग्वालियर
मुन्नालाल गोयल, ग्वालियर पूर्व
गोविंद सिंह राजपूत, सुरखी
रणवीर जाटव, गोहद
महेंद्र सिंह सिसौदिया, बमोरी
जजपाल सिंह जज्जी, अशोकनगर
बिजेंद्र सिंह यादव, मुंगावली
मनोज चौधरी, हाटपिपल्या
सुरेश धाकड़, पोहरी
रक्षा सिरोनिया, भांडेर

शिंदे समर्थक उमेदवार जे सध्या पिछाडीवर आहेत

रघुराजसिंह कंसाना, मुरैना गिर्राज सिंह दंडोतिया, दिमनी कमलेश जाटव, अंबाह सूबेदार सिंह, जौरा जसवंत सिंह जाटव, करैरा ओपीएस भदौरिया, मेहगांव

ग्वालियर-चंबलच्या 16 मध्येही शिंदेंचे 6 समर्थक पिछाडीवर
ग्वालियर-चंबलच्या 16 जागांवरही 6 शिंदे समर्थक उमेदवार पिछाडीवर आहेत. मुरैना, दिमनी, अंबाह, जौरा, करैरा आणि मेहगांव येथील ते सहा सीट आहेत. यामध्ये दोन मंत्र्यांचाही समावेश आहे. ओपीएस भदौरिया आणि गिर्राज सिंह.

बातम्या आणखी आहेत...