आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jyotiraditya Scindia; Narendra Modi Cabinet Minister; Bjp To Give Big Gift To Scindia

केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदल:15 महिन्यांपूर्वी भाजपमध्ये सामील झालेल्या ज्योतिरादित्य सिंधियांना मिळू शकते रेल्वे मंत्रालयाची जबाबदारी

भोपाळ | राजेश शर्माएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पहिल्या टर्ममध्ये 6 महीन्यात झाला होता मंत्रिमंडळ विस्तार

मागच्या वर्षी मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकार पाडण्यात महत्वाची भूमिका निभावणारे राज्यसभा खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांना लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळात जागा मिळणार आहे. मोदी सरकार 2.0 चे 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मंत्रिमंडळ विस्तार करण्याच्या तयारीत आहेत. या संदर्भात मोदींनी जेपी नड्डा आणि अमित शहांसौबत चर्चा केली आहे. यानंतर ज्योतिरादित्य सिंधिया यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळणार असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून करण्यात येतोय.

सिंधिया समर्थकांपैकी एक जेष्ठ नेत्याने सांगितले की, सिंधिया यांना केंद्रीय मंत्रिमंडळात रेल्वे मंत्रालय मिळण्याची दाट शक्यता आहे. पण, त्यांना शहर विकास किंवा मानव संसाधन मंत्रालयाही जबाबदारी मिळण्याच्याही चर्चा सुरू आहेत. सिंधिया यांना भाजपमध्ये येऊन 15 महीने झाले आहेत. आता भाजप त्यांना दिलेले वचन पूर्ण करणार आहे.

मनमोहन सरकारमध्ये बनली होती अॅक्टिव्ह मंत्र्याची इमेज

जानकारांचे मत आहे की, मोदी ज्योतिरादित्य यांना कॅबिनेट मंत्रीपद देतील. याचे कारण म्हणजे, मनमोहन सरकारमध्ये त्यांनी आपल्या कामाच्या जोरावर एक अॅक्टिव्ह मंत्र्याची इमेज बनवली होती. त्यांच्या याच इमेजचा फायदा भाजपला होऊ सकतो.

भाजपची नजर तरुण नेतृत्वांवर
सूत्रांनी सांगितल्यानुसार, भाजप आता पक्षातील तरुण नेतृत्वांना संधी देण्याच्या तयारीत आहेत. यामुळेच मोदींच्या मंत्रिमंडळात मध्यप्रदेशातून ज्योतिरादित्य सिंधिया, असाममधून माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ओडिशामधून बैजयंत पांडा, महाराष्ट्रातून देवेंद्र फडणवीससह अनेक तरुण चेहऱ्यांना संधी मिळू शकते. दरम्यान, महाराष्ट्राचा विचार केला तर, राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्या उदयनराजेंच्याही नावाची जोरदार चर्चा सुरू आहे.

पहिल्या टर्ममध्ये 6 महीन्यात झाला होता मंत्रिमंडळ विस्तार

नरेंद्र मोदींच्या पहिल्या कार्यकाळात 6 महीन्यांमध्ये कॅबिनेट विस्तार झाला होता. त्यावेळेस मंत्र्यांची संख्या 45 वरुन 66 केली होती. यानंतर सरकारची 2 वर्षे पूर्ण झाल्यानंतर जुलै 2016 मध्ये पुन्हा फेरबदल करुन मंत्र्यांची संख्या 78 केली होती.

दुसऱ्या टर्ममध्ये 57 मंत्र्यांसह शपथ घेतली
मोदींनी टर्मची सुरुवात करताना 30 मे 2019 ला 57 मंत्र्यांसह शपथ घेतली होती. सध्या मंत्रिमंडळात 53 मंत्री आहेत. रामविलास पासवान आणि सुरेश अंगाडी यांचे निधन झाले आहे. तर, हरसिमरत कौर बादल आणि अरविंद सावंत यांनी राजीनामा दिला.

बातम्या आणखी आहेत...