आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भाजप नेते ज्योतिरादित्य शिंदे आणि त्यांच्या आई माधवी राजे शिंदे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्योतिरादित्य यांच्यात कोरोनाचे सौम्य लक्षण आहेत, तर त्यांच्या आईमध्ये लक्षणे आढळून आलेली नाहीत.
सोमवारी दिल्लीच्या मॅक्स हॉस्पीटलमध्ये दाखल
दोघांना सोमवारी गळ्यात इनफेक्शन आणि सौम्य ताप आल्यानंतर दिल्लीतील मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच दिवशी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. अद्याप हॉस्पीटल किंवा शिंदे कुटुंबाने कोरोना झाल्याची अधिकृत घोषणा केली नाही.
श्री @JM_Scindia जी, पूज्य माताजी और आपके अस्वस्थ होने का समाचार मिला। ईश्वर से आपके और माताजी के शीघ्र स्वस्थ होने की प्रार्थना करता हूं।
— Shivraj Singh Chouhan (@ChouhanShivraj) June 9, 2020
ग्वालियरमधून सूत्रांनी सांगितले की, पाच दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य, आई माधवी राजे, पत्नी प्रियदर्शिनी, मुलगा महाआर्यमन आणि मुलगी अनन्या राजेची कोरोना चाचणी झाली होती. त्या तिघांच्या रिपोर्ट निगेटिव्ह आल्या, तर आई आणि ज्योतिरादित्य यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.