आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Jyotiraditya shinde deleted bjps name from twitter but he never put the name of bjp in the bio

फॅक्ट चेक :ज्योतिरादित्य शिंदे यांनी ट्विटरवरुन भाजपचे नाव हटवले ? परंतू, त्यांनी कधीच भाजपचे नाव बायोमध्ये टाकलेच नाही

भोपाळएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्योतिरादित्य शिंदे यांनी तीन महिन्यांपूर्वीच 18 वर्षांपासून सोबत असलेल्या काँग्रेसचा हात सोडून भाजपमध्ये प्रवेस केला होता. त्यांचा भाजप प्रवेश हा, त्यावेळेस देशातील खुप मोठा मुद्दा बनला होता. अशा मोठ्या नेत्याची लहानातल्या लहान गोष्टीचाही सोशल मीडियावर बाऊ केला जातो. मागील 24 तासात असेच काहीसे झाले आहे.

सोशल मीडियावर लोक दावा करत आहेत की, शिंदे भाजप सोडत आहेत

काय व्हायरल : ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर बायोमधून भाजपचे नाव हटवले. कोणत्याही क्षणी पक्ष सोडू शकतात.

काही ट्विटर अकाउंट, ज्यांनी ही माहिती व्हायरल केली

फॅक्ट चेक 

- ज्या ट्विटर बायो वाल्या तथ्याच्या आधारे हा दावा केला जात आहे, की ज्योतिरादित्य भाजप सोडणार आहेत, त्यात काहीच तथ्य नाही. खरतर, सिंधिया यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये भाजपचे नाव कधीच लिहीले नाही. सोशल मीडियालर जे स्क्रीनशॉट व्हायरल होत आहेत, त्यात कोणताच असा बायो नाही, ज्यात शिंदे यांनी पूर्वी भाजपचे नाव लिहीले होते.

-  शिंदे यांची ट्विटर बायो लक्ष देऊन पाहा, त्यात त्यांचा प्रोफाइल फोटोदेखील आहे. प्रोफाइल पिक्चरमध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षाचा गमछा घातला आहे.

- हा गमछा शिंदे यांनी पक्षात प्रवेश करतेवेळी घातला होता. हा प्रतीकात्मक संदेश होता की, ते पूर्णपणे भाजपमध्ये प्रवेश घेत आहेत. त्यांना जर पक्ष सोडायचा असता, तर त्यांनी भाजपचा गमछा असलेला फोटो काढला असता.

-  5 जूनपासून ज्योतिरादित्य यांच्या पक्ष सोडणाऱ्या अफवेने जोर पकडला. परंतू, 6 जूनला त्यांनी केलेल्या एका ट्वीटमधूनच, ते भाजपमध्ये असल्याचे कळते.

-  मध्यप्रदेशात 24 विधानसभा जागांच्या पोटनिवडणुका होणार आहेत. या जागांवर भाजपने प्रभारी नियुक्त केला आहे. 6 जून सकाळी 11:30 वाजता शिंदे यांनी या सर्व प्रभारींना शुभेच्छा दिल्या.

- 6 जूनलाच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी 12:55  केलेल्या ट्वीटला शिंदे यांनी रिट्वीट केले होते.

-  राजकारणात हे सांगणे अवघड आहे की, कोण कधी, कोणत्या पक्षात सामील होईल. पण, ट्विटर बायोच्या आधारावर शिंदे पक्ष सोडणार असल्याच्या माहितीत काहीच तथ्य नसल्याचे समोर आले आहे.

निष्कर्ष : ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपल्या ट्विटर बायोमध्ये कधीच भाजपचा उल्लेख केला नाही. 

0