आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • The Story Of Students Who Are Busy Preparing For Medical Exams By Forgetting 'home Worries'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळ, देशातील आँखो देखा हाल:काेराेना हिरावणार नाही भाग्यातील ‘काेटा’; हाेस्टेलमध्येएकटी, एकीचे वडील बाधित, पण अभ्यास थांबलेला नाही...

कोटा10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘घराची चिंता’ िवसरून मेडिकल परीक्षेच्या तयारीत व्यग्र विद्यार्थ्यांची कहाणी

चंबळ नदीच्या किनारी वसलेल्या राजस्थानमधील काेटा शहर अनलाॅक तर झाले, परंतु तरीही येथील जनजीवनात बकालपणा आला आहे. कारण शहराची शान असलेले व शिक्षणासाठी आलेले १.५० लाख विद्यार्थी घरी परतले आहेत. त्यात आजूबाजूच्या जिल्ह्यांतील सुमारे ६ ते ७ हजारांवर विद्यार्थी आहेत. नीटची तयारी करणारी केवळ दाेन हजार मुले येथे राहिली आहेत. त्यापैकी काही विद्यार्थी कुटुंबातील सदस्यांसाेबत आहेत. काही अगदी एकटेच. दरवर्षी काेटा येथे येणाऱ्या विद्यार्थ्यांची गर्दी असते. नीट व जेईईच्या तयारीसाठी विद्यार्थ्यांची संख्या १.६० लाखावर असते. एका िवद्यार्थ्याचे सरासरी शुल्क एक ते सव्वा लाख रुपये असते. सुमारे एक लाख रुपये त्यांचे निवास व भाेजनावर खर्च हाेतात. अशा प्रकारे काेटामध्ये काेचिंग उद्याेगातून वार्षिक ३०० काेटी रुपयांची उलाढाल हाेते. काेटा काही वर्षांपूर्वी वर्ल्ड ट्रेड फाेरमच्या यादीत जगातील सातवे सर्वाधिक वर्दळीचे शहर म्हणून नाेंदवण्यात आले हाेते. अनलाॅकनंतर काेचिंग सेटर्सचे २५०० शिक्षक सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिकवत आहेत. मुले घरी परतल्यामुळे १५०० हाेस्टेल, ३ हजारांवर मेसही बंद आहेत. त्याशिवाय तेथे काम करणारे १० हजारांवर लाेक बेराेजगार झाले आहेत.

एका माेठ्या संस्थेचे प्रतिनिधी नितेश शर्मा म्हणाले, लाॅकडाऊनमध्ये आम्ही आमच्या टीम उतरवल्या. मुलांना नाष्टा-भाेजनही दिले. सर्व काेचिंग सेंटर्सनी प्रशासनाला साथ देत ५० हजारांवर मुलांना घरी पाेहाेचवले. दुसरीकडे लाॅकडाऊनच्या काळातही काही जिद्दी विद्यार्थी दिसून आले. कितीही वैयक्तिक अडचणी असल्या तरी त्यावर मात करून त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला आहे. अशा िवद्यार्थ्यांबद्दल जाणून घेऊया....

‘घराची चिंता’ िवसरून मेडिकल परीक्षेच्या तयारीत व्यग्र विद्यार्थ्यांची कहाणी

घरी गेले हाेते, पण नातेवाईक आल्याने मैत्रिणींसह परतले
मी मूळची टाेंकची आहे. काेराेना लाॅकडाऊनदरम्यान घरी गेले हाेते. तेथे काही रुग्ण आढळले हाेते. परंतु आता ताे भाग ग्रीन झाेन आहे. घरी नातेवाईकही आले हाेते. गर्दी हाेऊ नये म्हणून तीन मैत्रिणींसह परतले. २६ जुलैला परीक्षा आहे. त्याची तयारी करत आहे. येथे काहीही समस्या नाही. नाष्टा, दुपारचे भाेजन, रात्रीचे जेवण वेळेवर मिळते. आधी येथे गर्दी हाेती. आता शांतता असल्याने अभ्यास चांगला हाेत आहे.
- शीनू सोलंकी, टोंक, राजस्थान

बहिणीला ब्रेन ट्यूमर, कुटुंबाने सांगितले- चिंता साेड, तेथेच अभ्यास कर
मी मूळची बक्सरची (पाटणा)आहे. माझ्या बहिणीला ब्रेन ट्यूमर झाल्याचे काही दिवसांपूर्वी कळले. मम्मी-पापा तामिळनाडूतील वेल्लाेरमध्ये उपचार करत आहेत. कुटुंब डिस्टर्ब हाेते. परंतु कुटुंबाने धीर दिला. चिंता साेड. अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. म्हणूनच लाॅकडाऊनच्या आधीपासून पहिल्या वर्षाची तयारी करत आहे. बहिणीची चिंता वाटते. परंतु तिच्यासाेबत आई-वडील असल्याने चिंता कमी वाटते.
- मुस्कान सिंह, बक्सर, बिहार

वडील बहरीनमध्ये, आईसाेबत, लाॅकडाऊनमध्ये सुरक्षित हीच जागा वाटली
पापा बहरीनमध्ये एराेनाॅटिकल इंजिनिअर आहेत. माझे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. २० जून २०१९ राेजी येथे आले हाेते. येथे घराहून जास्त चांगले वाटते. अभ्यास चांगला हाेत असल्यास काही अडचण आहे, असे मला वाटत नाही. आई माझ्यासाेबत आहे. बहिणीचे एनआयटी अलाहाबाद येथे अभियांत्रिकीचे शिक्षण झाले. ती एमबीएसाठी इंदूरमध्ये आहे. लाॅकडाऊनमध्ये मला तरी हीच सुरक्षित जागा वाटली.
- सायमा रहमान, एनआरआय

पापा-मम्मी दाेघेही आजारी, माझी तयारी पूर्ण, परीक्षा देणारच
नीटसाठी माझे केंद्र हैदराबादेत आहे. ७ जूनला आरक्षण हाेते. परंतु ६ जूनला पापा काेराेना पाॅझिटिव्ह असल्याचे कळले. ते हैदराबादच्या रुग्णालयात आहेत. आता नवे रिझर्व्हेशन आहे. परीक्षेला एकटीच जाणार आहे. आईला महिन्यापूर्वी ब्रेनस्ट्राेक आला हाेता. ती सध्या काेलकात्यास आजाेबांकडे आहे. या सहामजली वसतिगृहात सध्या मी व वाॅर्डन सुनीता मावशी आहाेत. त्या माझी खूप काळजी घेतात. अभ्यासातही मदत करतात.

- जेनेट विल्यम, हैदराबाद

बातम्या आणखी आहेत...