आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kailash Vijayvargiya West Bengol Incident; Kailash Vijayvargiya To Get Z Security With Bullet Proof Car, Latest News Update; BJP West Begal Convoy Attack

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ:Z सिक्योरिटीसह मिळणार बुलेट प्रूफ गाडी, 4 दिवसांपूर्वी बंगालमध्ये झाला होता हल्ला

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • नड्डांच्या ताफ्यात दगडफेक झाल्यानंतर राजकारण तापले

भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांच्याकडे आधापासूनच Z सिक्योरिटी होती. आता त्यांना बुलेटप्रूफ गाडीदेखील मिळणार आहे. तीन दिवसांपूर्वी पश्चिम बंगालमध्ये भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक झाली होती. यात कैलाश विजयवर्गीय जखमी झाले होते. भाजपने या हल्ल्यामागे तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हात असल्याचा आरोप केला आहे.

नड्डांच्या ताफ्यात दगडफेक झाल्यानंतर राजकारण तापले

10 डिसेंबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा बंगाल दौऱ्यावर असताना कोलकातावरुन डायमंड हार्बर शहराकडे जाताना त्यांच्या ताफ्यावर तुफान दगडफेक झाली होती. यात कैलाश विजयवर्गीय जखमी झाले होते. यानंतर 11 डिसेंबरला बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ममता सरकारवर गंभीर आरोप लावले होते. ते म्हणाले की, आगीशी खेळू नका. जे झाले ते चुकीचे आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी आपली जबाबदारी ओळखून माफी मागावी.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser