आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • President Scientist Dr. Abdul Kalam Was One In A Million, Latest News And Update

करिअर फंडा:राष्ट्रपती वैज्ञानिक डॉ. अब्दुल कलाम होते लाखांत एक, कल्पकता व सर्जनशीलतेतून बनवले जबरदस्त क्षेपणास्त्र

शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधने16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका गरीब, नाव चालवणाऱ्या वडिलांच्या पोटी जन्मलेले अवुल पाकीर जैनुलब्दीन अब्दुल कलाम यांनी सतत कठोर कष्ट व एका निश्चित उद्दीष्टातून शत्रूच्या उरात धडकी भरवणाऱ्या क्षेपणास्त्राची निर्मिती केली. त्यांनी भारताच्या राष्ट्रपतीपदाची शोभा वाढवली.

करिअर फंडात स्वागत!

"तुम्ही अपयशी ठरलात, तर कधीही हार मानू नका. कारण FAIL चा अर्थ आहे "First Attempt to Learn". - ए.पी.जे. अब्दुल कलाम.

मला आजही आठवते, 2002 मध्ये मी माझ्या एका वर्गात डॉक्टर कलाम यांच्या "इंडिया 2020 व्हिजन" डिस्कस केले होते. त्यामुळे मी आज तुम्हाला डॉक्टर कलाम यांच्या जीवनाशी संबंधित 5 मोठे धडे देणार आहे.

विंग्स ऑफ फायर – एपीजे अब्दुल कलाम एक भारतीय एअरोस्पेस संशोधक व जुलै 2002 ते जुलै 2007 पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते. त्यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तत्कालीन मद्रास प्रेसिडेन्सीमधील (आजचे तामिळनाडू) रामेश्वरम पर्यटन स्थळाजवळील पंबन द्विपावरील एका तमिळ मुस्लिम कुटुंबात झाला. त्यांचे वडील जैनुलाबदीन मरकयार एका जहाजाचे मालक व स्थानिक मशिदीत इमाम होते. त्यांच्या मातोश्री आशिअम्मा एक गृहिणी होत्या. त्यांचे वडील आपल्या जहाजातून भाविकांची रामेश्वरम व धनुषकोडी येथे ने-आण करत होते. आपल्या विद्यार्थी दशेत कलाम यांची टक्केवारी सरासरी होती. पण ते शिकण्याची तीव्र इच्छा असणारे एक हुशार व मेहनती विद्यार्थी म्हणून ओळखले जात. त्यांनी आपल्या शिक्षणावर विशेषतः गणितावर अनेक तास खर्च केले. धडा -अत्यंत छोट्या पातळीवरुन सुरू केल्यानंतरही ते चालत राहिले आणि एकेदिवशी यशोशिखर सर केले.

मिसाइल मॅन – आपल्या जीवनातील 4 दशक त्यांनी एक वैज्ञानिक व विज्ञान प्रशासक म्हणून संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) व भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (इस्रो) घालवली. बॅलेस्टिक क्षेपणास्त्र व प्रक्षेपण यान तंत्रज्ञानाच्या विकासातील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना भारताचे मिसाइल मॅन म्हणून ओळखले जाते. भारताने 1974 साली राजस्थानच्या पोखरणमध्ये पहिली अणुचाचणी घेतली. त्यानंतर 1998 मध्ये दुसरी अणुचाचणी घेतली. या चाचणीत कलामांनी महत्वाची भूमिका बजावली. ते डॉक्टर विक्रम साराभाई यांनी अंतराळ संशोधनासाठी स्थापन केलेल्या भारतीय राष्ट्रीय समितीतही (INCOSPAR) सहभागी होते. एकीकृत क्षेपणास्त्र विकास कार्यक्रमांतर्गत (IGMDP)त्यांनी अग्नी व पृथ्वीसारखी क्षेपणास्त्र विकसित करण्यात महत्वाची भूमिका बजावली.

शानदार विचारवंत व लेखक – भारताचे पहिले व आतापर्यंतचे एकमेव वैज्ञानिक राष्ट्रपती डॉक्टर कलाम यांनी केवळ विज्ञानातच नव्हे तर भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणूनही उल्लेखनीय काम केले. त्यांना व्यापकपणे जनतेचे राष्ट्रपती म्हणून ओळखले जात होते. ते नेहमीच मुले व तरुणांशी संवाद साधत. त्यांनी अनेक पुस्तके लिहिली. त्यात (1) इंडिया 2020: ए व्हिजन फॉर द न्यू मिलेनिअम, (2) विंग्स ऑफ फायर - अॅन ऑटोबायोग्राफी, (3) इग्नाइटेड माइंड्स - अनलीशिंग द पॉवर वीदिन इंडिया आदी प्रमुख आहेत.

डॉ.कलाम यांच्या जीवनातून पाच धडे शिकुया

1) कधीही हार मानू नका – जीवनात अपयशाला सामोरे जाताना कलाम हार मानू नका, तर या अपयशाचे यशात रुपांतर करण्यासाठी आणखी कठोर परिश्रम करण्याचा सल्ला देतात. त्यांचा असा विश्वास आहे की, अपयश व यश एकमेकांच्या हातात हात घालून चालतात. त्यामुळे अपयशाचा सामना केल्याशिवाय यश मिळू शकत नाही. त्यांनी विकसित केलेल्या अग्नी क्षेपणास्त्राला यशापूर्वी अनेक अपयशांचा सामना करावा लागला. पण त्यानंतरही त्यांनी चिकाटी सोडली नाही.

2) एक व्हिजन ठेवा - यशस्वी जीवन जगण्यासाठी दृष्टी व रणनीती या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुमच्या मनात स्पष्ट दृष्टी असेल, तर तुम्ही शेवटी योग्य धोरणाचा स्वीकार कराल. त्यांचे संपूर्ण जीवन याचे उदाहरण आहे. कलाम यांना त्यांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांत एअरफोर्सचे वैमानिक व्हायचे होते. पण त्यांची निवड न झाल्याने ते थोडे निराश झाले. त्यानंतर त्यांनी डीआरडीओ व इस्रोमध्ये यशस्वी कारकीर्द केली!

3) इनोव्हेटिव्ह व्हा - कलाम यांनी नागरिकांना सर्जनशीलतेने विचार करण्यास व इतरांपेक्षा वेगळे करू शकणारी तंत्रे ओळखण्यास प्रोत्साहित केले. त्यांनी अनेकांना माहीत नसलेला मार्ग निवडण्याची व नवनवीन कल्पनांनी समस्या सोडवण्यासाठी प्रेरित केले.

4) साधेपणा - कलाम यांचे आयुष्य अत्यंत साधे होते. शेवटपर्यंत दही-इडली हा त्यांचा आवडता नाश्ता राहिला. एवढा मोठा शास्त्रज्ञ असूनही, आयुष्यातील बराच काळ ते पायात साधी चप्पल व अंगात साधा शर्ट घालत राहिले. एकदा त्यांना कामानिमित्त तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंगिरा गांधी यांची भेट घेण्यासाठी जायचे होते. त्यावेळी पहिल्यांदा त्यांच्या मनात बूट घालण्याचा विचार आला. मोठे होणे म्हणजे साधे असणे!

5) कधीही थांबू नका - याशिवाय शौर्य, मोठी स्वप्ने पाहणे, समर्पण, सकारात्मक वृत्ती असे अनेक गुण कलमांकडून शिकता येतात. डॉ. कलाम हे लढाऊ विमान उडवणारे पहिले भारतीय राष्ट्रपती होते. त्यांच्या पहिल्या वैमानिकी प्रकल्पामुळे त्यांना भारताचे पहिले स्वदेशी हॉवरक्राफ्ट 'नंदी' डिझाइन करण्याची प्रेरणा मिळाली. माजी राष्ट्रपतींनी देशाच्या आरोग्य क्षेत्रातही उल्लेखनीय योगदान दिले. 90 च्या दशकाच्या सुरुवातीस, त्यांनी हृदयरोगावर 'कलाम-राजू-स्टेंट' विकसित करण्यासाठी हृदयरोगतज्ज्ञ बी सोमा राजू यांना मदत केली.

भारत रत्न डॉक्टर कलाम भारतीय विद्यार्थी व नागरिकांसाठी प्रेरणा स्त्रोत म्हणून सदैव स्मरणात ठेवले जाईल.

तर आजचा संडे मोटिव्हेश्नल करिअर फंडा हा आहे की, कल्पकता व सातत्यपूर्ण चिकाटी आपल्याला डॉक्टर कलामांच्या मार्गावर चालण्यास प्रेरित करू शकते.

करून दाखवू या!

बातम्या आणखी आहेत...