आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Cheeks | Marathi News | Kangana Ranaut Cheeks Controversial Statement Of Congress Leaders Dr. Irfan Ansari

पुन्हा गालाची तुलना:"कंगनाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते बनवू", गुलाबराव पाटीलनंतर आता पुन्हा एका काँग्रेस नेत्याचे गालावरुन विधान

नवी दिल्ली10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे एक आमदार आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन चांगलेच चर्चेत आले आहेत. शिवसेने नेते गुलाबराव पाटील यांच्याप्रमाणेच या आमदाराने कंगना रनौटच्या गालाची तुलना रस्ताशी केली आहे. त्यामुळे काँग्रसेचे हे आमदार चांगलेच चर्चेत आले आहेत.

झारखंड जामताडाचे डॉ. इरफान अन्सारी हे सध्या आपल्या वादग्रस्त वक्तव्यावरुन नेहमी चर्चेत असतात. यावेळी त्यांनी आपल्या परिसरातील रस्त्याची तुलना कंगनाच्या गालाशी केली आहे. 'कंगना रनौटच्या गालापेक्षाही सुंदर रस्ते आम्ही बनवणार' असे अन्सारी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाचा एक व्हिडिओ सध्य़ा सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

कंगणाच्या गालापेक्षाही जास्त सुंदर रस्ते आम्ही बनवणार, त्यामुळे आदिवासी मुले. तरुण आणि व्यापारी वर्गाला याचा मोठा फायदा होईल. असे अन्सारी यांनी म्हटले आहे. अन्सारी यांनी आपल्या मतदारसंघासाठी सरकारकडून 14 रस्ते मंजुर करुन घेतले आहेत. या रस्त्याच्या बांधकामासंदर्भात बोलताना अन्सारी यांची जिळ घसरली. त्यावेळी त्यांनी रस्त्याची तुलना कंगनाच्या गालाशी केली आहे. त्यामुळे आता कंगनाकडून याप्रकरणी काय उत्तर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, काही दिवसांपुर्वी जळगावात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हेमा मालिनीच्या गालाची तुलना आपल्या मतदारसंघातील रस्त्यांशी केली होती. त्यानंतर राज्यात देखील मोठ्या प्रमाणात टिका-टिप्पणी करण्यात आल्या होत्या. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या प्रकरणाची दखल घेत कारवाईचा इशारा दिला होता. त्यानंतर गुलाबरावांनी आपल्या गालाच्या वक्तव्यावरुन माफी मागितली होती.

बातम्या आणखी आहेत...