आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kangana Ranaut Quarantined By Himachal Pradesh Health Department As A Precaution For 10 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाची खबरदारी:कंगना रनोट 10 दिवस घरातच राहणार,  हिमाचल प्रदेश आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून केलं क्वारंटाइन

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कंगना मुंबईतून आली असल्याने तिला हिमाचल प्रदेश आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून क्वारंटाइन केलं आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनोटने एक वादग्रस्त वक्तव्य केलं आणि मोठा गदारोळ झाला. यानंतर ती मुंबईत आली आणि येथे पाच दिवस राहिल्यानंतर ती पुन्हा हिमाचल प्रदेशमधील मनालीला तिच्या घरी परतली आहे. दरम्यान तिथे गेल्यानंतर तिला दहा दिवसांसाठी क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या ही जास्त आहे. यात मुंबई कंटेनमेंट झोन आहे. यामुळे कंगना मुंबईतून आली असल्याने तिला हिमाचल प्रदेश आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून क्वारंटाइन केलं आहे. असे असल्याने कंगनाला आता पुढचे दहा दिवस घराच राहावे लागणार आहे. तिला कुठेही बाहेर जाता येणार नाही तसेच कुणाचीही भेट घेता येणार नाही. तसेच कंगना रनोटची पुन्हा एकदा कोरोना चाचणी केली जाणार आहे. ती मुंबईला येतानाही तिची चाचणी करण्यात आली होती.

दरम्यान,मुंबईत पाच दिवस राहिल्यानंतर अभिनेत्री कंगना रनोट सोमवारी सकाळी बहीण रंगोलीसह मनालीला रवाना झाली. मनालीला रवाना होण्यापूर्वी कंगनाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारे ट्वीट केले. विशेष म्हणजे, यात कंगनाने उद्धव यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे यांचे नाव घेतले होते.

कंगना म्हणाली- बघुयात कोण कुणाला फिक्स करतं ते...

कंगना सोमवारी मनालीस्थित तिच्या घरी पोहोचली. त्यानंतर तिने एक ट्विट केले. तिने लिहिले, 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची हीच मूळ समस्या आहे की, मी मुव्ही माफिया, सुशांत सिंहचे हत्यारे आणि त्यांचं ड्रग्ज रॅकेट यांचा पर्दाफाश केला. ज्यांच्यासोबत त्यांचा प्रिय मुलगा आदित्य ठाकरे फिरत असतो. हाच माझा मोठा गुन्हा आहे, त्यामुळे ते मला मॅनेज करू पाहत आहेत. पण, बघू कोण कुणाला फिक्स करतं ते.'

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser