आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर भारतात थंडीची लाट आली असून कानपूरमध्ये सर्वाधिक थंडी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हृदयविकार येण्याचे प्रकार वाढले आहेत. कानपूरमध्ये रात्रीचे तापमान 3.2 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. गुरुवारी रात्रीपर्यंत केवळ दोन सरकारी रुग्णालयात हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकमुळे 25 जणांना जीव गमवावा लागला. कार्डिओलॉजीच्या ओपीडीमध्ये रुग्णांची संख्या जास्त राहिली.
लक्ष्मीपत सिंघानिया हृदयरोग संस्थेचे संचालक डॉ.विनय कृष्णा यांनी सांगितले की, हृदयविकाराच्या समस्या घेऊन 723 रुग्ण आले होते. त्यापैकी 41 रुग्णांना दाखल करुन घेतले. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच 15 रुग्णांचा मृत्यू झाला. त्याचवेळी उपचारादरम्यान 7 रुग्णांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, उन्नावच्या 65 वर्षीय संध्या, कल्याणपूरच्या 74 वर्षीय राजोल आणि हलत हॉस्पिटलमध्ये आणलेल्या कन्नौजच्या 70 वर्षीय झाकीर यांचा ब्रेन स्ट्रोकमुळे मृत्यू झाला आहे.
राजस्थान -6 अंश तापमानाने गारठून गेले आहे. तर शिमला-नैनितालपेक्षा जास्त थंडी ही दिल्लीत पडत आहे. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत आज तापमान 1.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्लीत थंडी हवेमुळे आँरेज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागानुसार 7 जानेवारीपासून डोंगराळ भागात पुन्हा बर्फवृष्टी सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर भारतातील मैदानी भागात तापमानात आणखी घसरण होऊ शकते, त्यामुळे थंडी वाढणार आहे.
दरवर्षी थंडीच्या लाटेमुळे अनेकांना जीव गमवावा लागतो. वाढत्या थंडीमुळे आधीच आजारी असलेल्या लोकांच्या शारिरीक गुंतागुंत वाढतात, ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो. त्याच वेळी, कोविड नंतर, हृदय, श्वास आणि फुफ्फुसांशी संबंधित अनेक आजार वाढले आहेत जे हिवाळ्यात घातक ठरू शकतात.
गुजरातेतील थंड वारे दाखल झाल्याने हुडहुडी
गुजरातकडून थंड वारे प्रति 11 तासांच्या वेगाने राज्यात दाखल झाल्याने थंडी अधिकच वाढली आहे. मागील महिनाभरातील गरमीच्या वातावरणानंतर जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात थंडी वाढली आहे. विशेष म्हणजे कमाल तसेच किमान दोन्हीही तापमानात कमालीची घट तसेच चढउतार होत असल्याने वातावरणही झपाट्याने बदलत आहे. सोमवारी (9 जानेवारी) किमान तापमान 10 अंशांवर जाणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. औरंगाबादेत तापमान 9 अंशावर खाली उतरले आहे. येथे वाचा संपुर्ण बातमी.
2022 चा डिसेंबर महिना 122 वर्षांत राहिला सर्वात कमी थंड
2022 चा डिसेंबर 122 वर्षांत सर्वात कमी थंडी असलेला महिना ठरला. डिसेंबरमध्ये देशाचे सरासरी तापमान (किमान) 21.49 अंश सेल्सियस इतके होते. ते 1901 नंतर सर्वाधिक आहे. ते सरासरी तापमानापेक्षा एक अंश जास्त आहे. यापूर्वी 2008 मध्ये सरासरी तापमान 21.46 अंश होते. तथापि, दिवसा व रात्रीचे तापमान इतिहासात दुसरे सर्वात उष्ण म्हणून नोंदवले गेले. येथे वाचा संपुर्ण बातमी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.