आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Gangster Vikas Dubey, The Main Accused In The Kanpur Shootout Case, Was Arrested From Ujjain

विकास दुबेला बेड्या:महाकाल मंदिरात पोलिसांचा मारेकरी ओरडला- मी विकास दुबे, कानपूरवाला; गृहमंत्री म्हणाले- कसे पकडले हे सांगणे उचित नाही

उज्जैनएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कानपूरमध्ये पोलिसांवर गोळीबाराचा मुख्य आरोपी अटकेत, 5 लाखांचे होते बक्षीस
Advertisement
Advertisement

कानपूरच्या बकरू शूटआउट प्रकरणात गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या शोध मोहिमेत गुरुवारी नाटकीय वळण लागले. या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेचे दोन सहकारी एनकाउंटरमध्ये ठार मारले गेल्यानंतर विकास पोलिसांच्या हाती लागला. तो मध्य प्रदेशच्या उज्जैन येथील महाकाल मंदिरात दर्शनासाठी गेला होता.

गेल्या 7 दिवसांपासून तो दिल्ली, नोएडा आणि फरिदाबादसह मध्य प्रदेशात लपल्याची चर्चा होती. एवढेच नव्हे, तर नेपाळमध्ये सुद्धा त्याने पळ काढला असावा अशी शक्यता वर्तवली जात होती. अशातच तो गुरुवारी पोलिसांना सापडला. मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सांगितले, की ‘‘गँगस्टर विकास दुबे मध्य प्रदेश पोलिसांच्या ताब्यात आहे. त्याला अटक कशी झाली. यासंदर्भात बोलणे उचित राहणार नाही. विकास सोबत यावेळी त्याचे दोन सहकारी बिट्टू आणि सुरेश या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.’’

विकासच्या अटकेवरून तीन मुद्दे समोर आले आहेत.

1. व्हीआयपी एंट्रीची पावती तयार करताना विकासने आपले खरे नाव लिहिले होते. तो गुरुवारी सकाळी बाबा महाकाल दर्शनासाठी आला. यावेळी त्याने 250 रुपयांच्या व्हीआयपी दर्शनाची पावती फाडली. यात त्याने आपले खरे नाव विकास यादव असे लिहिले. यानंतर दर्शनासाठी मंदिर परिसरात पोहोचला. दर्शन घेतल्यानंतर त्या ठिकाणी जवानांकडे गेला आणि ओकडून सांगितले की मी विकास दुबे आहे. मला अटक करा.

2. दुसरा मुद्दा म्हणजे, यात संशय आल्यानंतर अटक झाली असेही सांगितले जात आहे. विकासला पकडणाऱ्या सिक्युरिटी गार्डने सांगितले, "मला संशय येताच त्याला थांबवून चौकशी केली. त्यावेळी त्याने मला टाळण्याचा प्रयत्न केला. याच दरम्यान, माझा संशय आणखी बळावला आणि मी पोलिसांना फोन करून घटनास्थळी बोलोवले. काही वेळातच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि विकासला अटक केली."

3. विकास मंदिरात आत्मसमर्पण करण्यासाठीच गेला होता असेही सांगितले जात आहे. महाकाल मंदिराचे पुजारी आशीष यांनी सांगितल्याप्रमाणे, एनकाउंटरमध्ये मारले जाण्याच्या भीतीने विकास दुबे यानवे आत्मसमर्पण करण्याचा निर्णय घेतला असावा. मंदिर परिसरात त्याने ओरडून सांगितले की मीच विकास दुबे आहे. त्यानेच सांगितले होते की पोलिसांना याची माहिती द्या.

विकासचा साथीदार अमर दुबे चकमकीत ठार

फरिदाबादमध्ये अटक केलेल्या प्रभातच्या माहितीवरून मंगळवारी रात्री यूपीच्या हमीरपूरमध्ये पोलिसांनी चकमकीत विकासचा नातेवाईक अमर दुबे याला ठार केले. अमर रंगकाम आणि दारूच्या ठेक्यांची वसुली करत असे. तोही पोलिसांच्या हत्येत आरोपी होता. अमरचा 9 दिवसांपूर्वीच विवाह झाला होता. आतापर्यंत या प्रकरणी 6 जणांना अटक करण्यात आली आहे.

येथे झाले एन्काउंटर

चौबेपुरच्या बिकेरू येथे झालेल्या गोळीबारात विकास दुबेचा एक साथीदार आरोपी प्रभात मिश्रा ठार झाला. पोलिसांनी बुधवारी प्रभातला फरीदाबाद येथून अटक केली होती. युपी पोलिस त्याला ट्रान्जिट रिमांडवर कानपूरला घेऊन जात होते. रस्त्यात प्रभातने पळून जाण्याचा प्रयत्न केला, त्याने पोलिसांची पिस्टल हिसकावून गोळीबार केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात प्रभात मारला गेला. दुसरीकडे विकास गँगचा बऊआ दुबे उर्फ प्रवीणला पोलिसांनी इटावात ठार केले. दोघेही गुंड 2 जुलै रोजी बिकरू गावातील 8 पोलिसांच्या हत्याकांडात सहभागी होते. 

Advertisement
0