आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kanpur Dehat Fire Deaths Video; Five Burned Alive In Kanpur Dehat | Uttar Pradesh | Kanpur

कानपूरमध्ये 5 जण जिवंत जळाले, VIDEO:मध्यरात्री झोपडीला आग, आजोबा म्हणाले- मूलं ओरडत होती, अवघ्या 5 मिनिटांत कुटुंब उद्वस्त झालं

कानपूर14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
रुरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हरमौ गावात बंजारा समाजाची मोठी वस्ती आहे. याच वस्तीतील एका झोपडीला आग लागली.

कानपूरच्या देहातमध्ये असलेल्या एका झोपडीला आग लागल्याने या आगीत पती-पत्नी आणि त्यांची तीन मुले जिवंत जळाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मध्यरात्री झोपडीला आग लागली तेव्हा सर्वजण झोपडीत गाढ झोपलेले होते. आगीचे रौद्ररूप इतके भयंकर होते की, त्यांना बाहेर देखील पडता आले नाही. माहिती मिळताच पोहोचलेल्या अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत कुटुंबातील पाच सदस्य आणि संपूर्ण घर जळून खाक झाले होते.

पोलिस स्टेशन प्रभारी सीओ आणि एसपी रात्री उशिरा घटनास्थळी पोहोचले. तपासानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले. ही घटना रुरा पोलीस ठाण्याच्या हरामौ गावातील बंजारा समाजाच्या वस्तीतील आहे.

जिवंत जळालेल्या लोकांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.
जिवंत जळालेल्या लोकांचे मृतदेह पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवले आहेत.

बंजारा डेरात शेकडो कुटुंबे झोपड्यांत राहतात
रुरा येथील हरमौ गावात बंजारा डेरा आहे. या वस्तीत शेकडो कुटुंबे झोपड्यांमध्ये राहतात. या डेऱ्यात प्रकाश हा पत्नी रेशम, मुलगा सतीश, सून काजल आणि दोन नातवंडांसह एका झोपडीत राहत असे. प्रकाश आणि सतीश हे मजूर म्हणून काम करायचे. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे घरी परतले. घरी पत्नी, सून आणि मुलांसोबत जेवण केले. यानंतर संपूर्ण कुटुंब झोपडीत गेले.

झोपडीबाहेर झोपलेले वृद्ध जोडपे
प्रकाश आणि त्यांची पत्नी रेशम हे झोपडीबाहेर दारातच खाट टाकून झोपले होते. रात्री उशिरा झोपडीला आग लागल्यावर सर्वप्रथम पालकांना जाग आली. आगीचे लोळ पाहून गावात एकच आरडाओरड झाली. मात्र छावणीतील लोकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत आतील पाचही जणांना आपला जीव गमावावा लागला.

पोलिसांना माहिती देताना मृत सतीशचे वडील प्रकाश
पोलिसांना माहिती देताना मृत सतीशचे वडील प्रकाश

मुलगा ओरडला- बाबांना वाचवा...
मृत सतीशचे वडील प्रकाश यांनी डोळ्यातील पाणी पूसत सांगितले की, एका कोपऱ्यातून लागलेल्या आगीने एका मिनिटात संपूर्ण झोपडीला वेढले. मुलाचा आवाज ऐकू आला... बाबांना वाचवा. आगीमुळे मुख्य दरवाजातून आत जाता आले नाही. दुसऱ्या बाजूने कुटुंबाला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर काढता आले नाही. पाच मिनिटात माझे संपूर्ण कुटुंबाची राखरांगोळी झाली. ही आग अचानक कशी लागली काहीच कळाले नाही.

हत्या की अपघात याचा पोलिसांकडून तपास
एसपी कानपूर देहात बीबीजीटीएस मूर्ती म्हणाले की, शनिवारी रात्री उशिरा झोपडीला आग लागली. या अपघातात सतीश (30) आणि काजल (26) या दाम्पत्यासह सनी (6), संदीप (5), गुडिया (3) या तीन मुलांचा होरपळून मृत्यू झाला.

आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिकांनी धाव घेत बादलीतून पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत पाचही जणांचा जळून मृत्यू झाला होता. आग विझवताना मृत सतीशची आई गंभीर भाजली. माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.

गंभीररित्या आगीत भाजलेल्या महिलेला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. झोपडीला आग कशी लागली याचा तपास करण्यात येत आहे. तपासादरम्यान काही संशयास्पद आढळल्यास आरोपींना सोडले जाणार नाही, असे पोलिसांनी सांगितले.

मृत सतीशची आई जी आपल्या लेकरांना वाचविण्यासाठी आगीत गेली होती. मात्र, त्या गंभीररित्या भाजली गेली.
मृत सतीशची आई जी आपल्या लेकरांना वाचविण्यासाठी आगीत गेली होती. मात्र, त्या गंभीररित्या भाजली गेली.

फॉरेन्सिक, श्वानपथक आणि पोलीस तपासात गुंतले
आग लागल्यानंतर एसपीसह फॉरेन्सिक टीम, श्वान पथक आणि पोलिस अधिकारी घटनास्थळी तपासासाठी पोहोचले. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा केले. बस्तीमध्ये उपस्थित लोकांची चौकशी आणि जबाबही नोंदवण्यात आले आहेत. जेणेकरून आगीचे सत्य समोर येईल.

शॉर्ट सर्किटमुळे आगीचा धोका
त्याचवेळी शॉर्टसर्किटमुळे झोपडीला आग लागल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू आहे. रात्री कुटुंब झोपले असताना शॉर्टसर्किट होऊन झोपडीला आग लागली. त्याचबरोबर पोलिसही आगीचे कारण तेच सांगत आहेत. सध्या तपासानंतरच कारणांची पडताळणी होणार असल्याची चर्चा पोलिसांनी केली आहे.

मृतांच्या नातेवाईकांना मदत केली जाईल
माहिती मिळताच डीएम नेहा जैनही घटनास्थळी पोहोचल्या. त्यांनी सांगितले की, "झोपडीला लागलेल्या आगीमुळे आई-वडील आणि तीन मुले जिवंत जळून खाक झाली आहेत. प्रथमदर्शनी, शॉर्ट सर्किटचे प्रकरण समोर येत आहे. सध्या हा तपासाचा विषय आहे. यामध्ये सर्व संभाव्य आर्थिक मृतांच्या नातेवाईकांना मदत केली जाईल,

बातम्या आणखी आहेत...