आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कानपुरात मध्यरात्री पोलिसांवर हल्ला:हिस्ट्री शीटरला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर फायरिंग, डीएसपीसह 8 पोलिस कर्मचारी शहीद, तर दोन हल्लेखोर ठार 

कानपूर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस गुरुवारी रात्री बिठूर थाना क्षेत्राच्या विकरु गावात पहारा देण्यासाठी गेले तेव्हा झाला हल्ला

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गुरुवारी रात्री एक वाजेच्या सुमारास पहारा देण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर दरोडेखोरांनी अंदाधुंद गोळीबार केला. यात सर्कल ऑफिसर (डीएसपी) आणि 3 उपनिरीक्षकांसह 8 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. चौबेपूर पोलिस स्टेशन परिसरातील एका गावात पोलिस हिस्ट्रीशीटर विकास दुबेला पकडण्यासाठी गेले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु त्याच्या टोळीने पोलिसांवर छतावरून हल्ला केला आणि विकास दुबे फरार झाला. या दरोडेखोरांनी पोलिसांची अनेक शस्त्रेही लुटली. दुसरीकडे आयजी मोहित अग्रवाल म्हणाले की, या घटनेनंतर विकास दुबेचे 2 सहकारी चकमकीत ठार झाले.

डीजीपी एचसी अवस्थी यांनी सांगितले की, कानपूर येथील राहुल तिवारी यांनी विकास दुबे विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिस त्याला पकडण्यासाठी बकरू गावात गेले. पोलिसांना रोखण्यासाठी तेथील जेसीबी इत्यादी पासून यापूर्वीच दरोडेखोरांनी रास्ता रोको केला होता. अचानक छतावरून गोळीबार सुरू झाला. त्याचबरोबर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसटीएफ टीमला कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. यूपीच्या सर्व सीमांना पोलिसांनी सील ठोकले आहे.

कडक कारवाई केली जाईल

एडीजी, कायदा व सुव्यवस्था प्रशांत कुमार यांनी सांगितले की, 7 लोक जखमी झाले, त्यातील 5 पोलिस होते. पोलिसांची शस्त्रे गायब आहेत, कोणाकडे शस्त्रे आहेत याचा शोध सुरू आहे. जे लोक या घृणास्पद कृत्यात सामील होते, त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. ते सापडतील आणि त्यांना कायद्यासमोर सादर करतील. आम्ही यासाठी स्पेशलिस्ट टीम तयार केली आहे.

बातम्या आणखी आहेत...