आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Kanpur Murder Case Latest News And Updates: Father Killed 3 Years Old Child Over Urinating On Bed In Kanpur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माथेफिरू बापाच्या कृत्य:पांघरुणात सू केल्यामुळे 3 वर्षीय मुलाची जमिनीवर आपटून हत्या, आरोपी बाप अटकेत

कानपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुलाच्या आईने पोलिसांना घटनेची माहिती दिली.

उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील एका माथेफिरू बापाने आपल्या तीन वर्षीय मुलाची जमिनीवर आपटून हत्या केल्याची घटना घडली आहे. त्या चिमुकल्याचा गुन्हा इतकाच होता की, त्याने आपल्या वडिलांच्या पांघरुणात सू केली आणि त्यामुळे बापाची झोपमोड झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, हमीरपूर जिल्ह्यातील छानी खुर्द गावातील रहिवासी संतराम प्रजापती आपल्या कुटुंबासह मजुरी करतो. मंगळवारी तीन वर्षीय मुलगा रवींद्रने झोपेत आपल्या वडिलांच्या पांघरुणात सू केली. यामुळे नाराज आरोपीने त्याला बेदम मारण्यास सुरुवात केली. यादरम्यान, आरोपीची पत्नी आणि इतर दोन मुलींनाही मारले. या मारहाणीत रविंद्रचा जागीच मृत्यू झाला. यानंतर त्याने पत्नी आणि मुलींना कोणालाही याबाबत सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

आपल्या डोळ्यासमोर मुलाला मरताना पाहून आईला अखेर राहावले नाही आणि तिने आपल्या भावाच्या मदतीने पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच आरोपी फरार झाला होता. दरम्यान, आरोपीच्या नातेवाइकांनी त्याला हमीरपुरमध्ये पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser