आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराउत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये झालेल्या हिंसाचाराचे धागेदोरे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी जुळत असल्याचे स्पष्ट होत आहे. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी सांगितले की, त्यांना पीएफआयशी संबंधित दस्तऐवज मिळाले आहेत. हिंसाचार भडकावणारा मुख्य आरोपी हयात जफर हाश्मी याचे पीएफआयशी संबंध समोर आले आहेत.
अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. शिवाय यतीमखाना ते क्रॉसरोडपर्यंत सुरक्षा वाढवण्यात आली आहे. हिंसाचार प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत ३६ लोकांना अटक केली आहे. त्यांची चौकशी केली जात आहे. यावर गँगस्टरविषयक कायदे आणि एनएसएनुसार कारवाई केली जाईल. तसेच सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. कानपूरचे पोलिस कमिश्नर विजयसिंह मीणा यांनी सांगितले की, काही सीसीटीव्ही फुटेज डिलीट करण्यात आले आहेत. असे करणाऱ्या समाजकंटकांची ओळख पटवून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.