आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकानपूरच्या बेकनगंज भागात शुक्रवारच्या नमाजानंतर मोठा राडा झाला. बाजार बंद करण्याच्या घोषणेमुळे दोन समुदायांत तुफान दगडफेक झाली. त्यानंतर झालेल्या संघर्ष नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर उपस्थितांनी दगडफेक केली. हा संमिश्र लोकसंख्येचा भाग आहे. त्यामुळे स्थिती तणावपूर्ण बनली आहे.
या हिंसाचाराची सुरुवात मुस्लिम नेते हयात जफर हाश्मी यांच्या बाजारपेठ बंद ठेवण्याच्या आवाहनामुळे झाली होती. तत्पूर्वी, भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी टीव्ही डिबेटध्ये प्रेषित पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्र विधान केल्यामुळे मुस्लिम समुदाय नाराज होता. या विधानाच्या निषेधार्थ त्यांनी बाजारपेठ बंदही ठेवली. पोलिसांच्या माहितीनुसार, शहरातील परेड चौकात शेकडो जण जमले होते. दुपारी 3 च्या सुमारास दोन्ही समुदायाचे लोक एकमेकांपुढे आले. त्यानंतर दगडफेक सुरू झाली. त्यात अनेकजण जखमी झाले. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांच्या लाठीमारानंतरही दगडफेक
पोलिसांनी जमाव पांगवण्यासाठी अनेक राऊंड गोळीबार केला. लाठीमारही केला. त्यानंतरही जमाव दगडफेक करत होता. त्यामुळे पोलिस संपूर्ण परिसराला घेराव घालून स्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांनी संशयाच्या आधारावर अनेकांची धरपकडही केली आहे. घटनास्थळी आरएएफसह जवळपास 12 पोलिस ठाण्यांतील कुमक मागवण्यात आली आहे.
बजरंग दलाचे नेते प्रकाश शर्मा व विहिंपच्या नेत्यांनी घटनास्थळी जाण्याचा प्रयत्न केला. पण, पोलिसांनी त्यांना काही अंतरावरच रोखून धरले. जिल्हाधिकारी नेहा शर्मा यांनी स्थितीचा आढावा घेतला आहे.
कानपूरमधील बाजारपेठा बंद
या हिंसाचारानंतर शहरातील विविध बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वत्र भयान शांतता पसरली आहे. पोलिसांनी खबरदारीस्तव शहरातील गस्त वाढवली आहे.
सीसीटीव्हीच्या मदतीने दंगेखोरांचा शोध
पोलिस आरोपींचा युद्धपातळीवर शोध घेत आहेत. सीसीटीव्हीच्या मदतीने दगडफेक करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. गोंधळ करणाऱ्यांना नियंत्रित करण्यासाठी आरएएफचे जवान तैनात करण्यात आलेत.
छायाचित्रांत दगडफेक
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.