- Marathi News
- National
- Kanpur Violence Violence First The Market Closed And Posters Filled The Jail, Then People Pelted The Streets With Stones | Marathi News
कानपूर हिंसाचाराचे 10 फोटो:पहिले बाजार बंद आणि जेल भरोचे पोस्टर चिकटवले, नंतर लोकांनी रस्त्यावर दगडफेक केली
बेकनगंजमध्ये झालेल्या गोंधळादरम्यान पोलिसांसमोर लोक बेकाबू झाले होते. दगडफेक करत होते. आता पोलिसांसाठी सर्वात मोठे शस्त्र आहे ते सीसीटीव्ही फुटेज आणि छायाचित्रे. ज्याद्वारे दंगलखोरांची ओळख पटवली जात आहे. पोलिस आयुक्त विजय कुमार मीणा यांचा दावा आहे की, हल्लेखोरांची ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर गँगस्टर कायद्यान्वये कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त केली जाईल.
हा फोटो यतिमखाना मार्केटचा आहे. येथूनच दगडफेकीला सुरुवात झाली. रस्त्यावर पसरलेले दगड हिंसाचाराची साक्ष देत आहेत.
गोंधळ सुरू झाल्यानंतर काही वेळातच हजारो लोक रस्त्यावर उतरले. त्यांना आटोक्यात आणण्यात पोलिस दलही कमी पडले.
मुस्लिमांच्या हल्ल्यानंतर हिंदूंनीही दगडफेक करून प्रत्युत्तर दिले, त्यानंतर परिस्थिती अधिक अनियंत्रित झाली.
दोन्ही बाजूंच्या काही लोकांनी तोंड झाकलेले होते, त्यामुळे त्यांची ओळख पटत नाहीये.
पोलिसांनी पाठलाग करून हुल्लडबाज लोकांना हाकलून लावल्यानंतर ते गल्ल्यांमध्ये गेले आणि तेथून त्यांनी पोलिसांवर आणि सर्वसामान्यांवर दगडफेक सुरू केली.
परिस्थिती अनियंत्रित होत असल्याचे पाहून अधिकाऱ्यांनीही रस्त्यावर पोलिस बंदोबस्त तैनात केला. त्यानंतर परिस्थिती शांत झाली.
कानपूरचे जिल्हा दंडाधिकारीही हेल्मेट घालून घटनास्थळी पोहोचले आणि फ्लॅग मार्चमध्ये सहभागी झाले. यावेळी दंगलखोरांना हुसकावून लावले.
गोंधळापूर्वी कानपूरच्या बाजारपेठेत अशी पोस्टर लावून मुस्लिम समाजातील लोकांना व्यवसाय बंद करण्याचे आवाहन करण्यात आले होते.