आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपींना अटक:कंझावला कांड : 800 पानांचे आरोपपत्र, 4 वर हत्येचा आरोप

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्ली पोलिसांनी शनिवारी रोहिणी कोर्टात कंझावला प्रकरणात ८०० पानांचे आरोपपत्र दाखल केले. त्यात ४ आरोपींवर हत्या व तिघांविरुद्ध अन्य कलमांन्वये आरोप निश्चित केले. १३ एप्रिल रोजी आरोपपत्रावर विचार केला जाईल. आरोपपत्रात पोलिसांनी ११७ साक्षीदारांचा हवाला दिला आहे. कंझावलामध्ये पीडिता अंजलीला वाहनाने फरपटत काही किमीपर्यंत नेले हाेते. पोलिसांनी मनोज, मिथुन, कृष्ण आणि अमितवर हत्या, पुरावा नष्ट करणे, कट रचल्याचा आरोप ठेवला आहे. अन्य तीन आरोपी दीपक, आशुतोष आणि अंकुशवर पुरावा नष्ट करणे, गुन्हेगारी कट रचणे आदी आरोप आहेत. चौकशीदरम्यान सर्व आरोपींना अटक केली होती.