आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Kapil Sibal Dinner Party With No Gandhi Family Member, Sharad Pawar And Sanjay Raut Were Also Present Latest News And Updates

गांधी कुटुंबियांविना 'पार्टी':गांधी कुटुंबियांविना कपिल सिब्बल यांच्या घरात विरोधी पक्षाच्या नेत्यांची मेजवानी; राहुल गांधी काश्मीरात तर प्रियंका परदेशात, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी सोमवारी संध्याकाळी आपल्या जन्मदिनानिमित्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना मेजवानी दिली. यासाठी काँग्रेस नेत्यांसह आणि भाजपचे विरोधक सुद्धा सिब्बल यांच्या निवास स्थानी दिसून आले. परंतु, या नेत्यांमध्ये गांधी घराण्यातील एकही सदस्य दिसलेला नाही. दरम्यान या मेजवानीत 2024 च्या निवडणुकीमध्ये भाजपला कसे घेरता येईल यावरच चर्चा रंगली.

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर आहेत. तर प्रियंका गांधी वाड्रा सध्या परदेशात आहेत. याच दरम्यान सिब्बल यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मेजवानीचे आयोजन केले होते. या पार्टीच्या निमित्ताने माध्यमात पुन्हा काँग्रेसच्या अंतर्गत वादाचा मुद्दा उठवण्यात आला आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, काँग्रेसचा कायापलट करण्यासाठी गांधी कुटुंबाने नेतृत्व सोडावे असे पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांचे मत आहे. तर अकाली दलाचे नेते नरेश गुजराल यांनी तर थेट गांधी कुटुंबावर निशाणा साधला. गांधी परिवाराच्या 'विळख्यातून' बाहेर पडल्याशिवाय काँग्रेसला बळकटी येणे कठिण आहे असे ते म्हणाले आहेत.

उल्लेखनीय बाब म्हणजे, सिब्बल यांच्यासह काँग्रेसच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी सोनिया गांधी यांना पत्र पाठवून पक्षात मोठ्या फेरबदलांची गरज व्यक्त केली होती. अशात गांधी कुटुंबियांविना सिब्बल यांच्या घरातील मेजवानी चांगलीच चर्चेत आहे. यामध्ये पी चिदंबरम, शशी थरूर आणि आनंद शर्मा यांच्यासह ज्येष्ठ नेत्यांनी उपस्थिती लावली. या तिन्ही नेत्यांनी काँग्रेसच्या भवितव्यावर सवाल केले होते.

शरद पवारांसह संजय राउत यांची उपस्थिती
यासोबतच सिब्बल यांच्या घरी NDA पासून वेगळे झालेले अकाली दलाचे नेतेही पोहोचले. विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, शिवसेना खासदार संजय राउत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूलचे नेते डेरेक ओ'ब्रायन, नॅशनल काँफ्रेन्सचे नेते ओमर अब्दुल्ला, द्रमुकचे त्रिरुची शिवा, रालोदचे जयंत चौधरी यांचा समावेश होता.

नवीन पटनायक यांच्या बीजू जनता दलाचे पिनाकी मिश्रा, तेदेप आणि वायएसआर काँग्रेस पक्षाचे नेते सुद्धा यात सामिल झाले होते. सिब्बल यांनी अकाली दलास सुद्धा यात निमंत्रित केले होते. त्यातील नरेश गुजराल सिब्बल यांच्या घरी पोहोचले होते. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावरून मतभेद झाल्यानंतर अकाली दलाने गतवर्षी NDA अर्थात राष्ट्रीय लोकशाही आघाडीची साथ सोडली. गांधी कुटुंबियांची अनुपस्थिती असली तरीही या मेजवानीत भाजपला घेरण्याची तयारी आणि केंद्रातील भाजप सरकारवर टीका हेच मुद्दे केंद्रस्थानी होते. या मेजवानीत उपस्थित असलेले ओमर अब्दुल्ला यांच्या मते काँग्रेस बळकट झाल्यास विरोधीपक्ष मजबूत होतो. पण, यासाठी काँग्रेसकडून काय प्रयत्न केले जात आहेत असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

बातम्या आणखी आहेत...