आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसंबंधी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले की, काँग्रेसने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा सामना करणाऱ्या आघाडीच्या केंद्रस्थानी राहिले पाहिजे. विरोधी पक्षांनी एक मजबूत आघाडी स्थापन करताना संवेदनशील राहण्याची गरज आहे. तसेच एकमेकांवर टीका करतानाही सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सिब्बल रविवारी वृत्तसंस्था PTI ला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
विरोधकांनी स्वतःचे मत मांडण्यासाठी व्यासपीठ शोधावे
कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकारला विरोध करणाऱ्या सर्व पक्षांना आपले म्हणणे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्यासपीठ शोधण्याचे आवाहन केले. हे व्यासपीठ 'इन्साफ के सिपाही' वेबसाइटही असू शकते, असे सिब्बल म्हणाले. केंद्र सरकारच्या अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी सिब्बल यांनी स्वतः हे व्यासपीठ सुरू केले आहे.
राज्यसभा खासदार म्हणाले की, 2024 साठी विरोधी आघाडीच्या नेतृत्वाच्या प्रश्नाचे या टप्प्यावर उत्तर देण्याची गरज नाही. त्यांनी यासंबंधी 2004 चे उदाहरण दिले. 2004 च्या निवडणुकीत विरोधकांचा पंतप्रधान चेहरा ठरला नव्हता. त्यानंतरही लोकसभा निवडणुकीनंतर अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सत्तेतून बाहेर पडले होते, असे ते म्हणाले.
शरद पवारांच्या विधानावरही भाष्य
कपिल सिब्बल यांनी यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्याविषयी केलेल्या विधानावरही भाष्य केले. तुम्ही मुद्दे कमी केले तरी राजकीय पक्षांमध्ये मतभेद होतील, असे ते म्हणाले.
भारतातील क्रोनी कॅपिटलिझमबद्दल राहुल गांधींची काही दृष्टी असेल, तर माझ्या मते शरद पवार सुद्धा क्रॉनी कॅपिटलिझमशी संबंधित व्यासपीठाच्या विरोधात नसतील. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ हवे आहे.
शरद पवारांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार
सिब्बल म्हणाले की, वेगवेगळ्या पक्षांना वेगवेगळे विचार मांडण्याची परवानगी असावी. तसेच राहुल गांधींनाही एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल त्यांचे मत मांडण्याची मुभा असावी. शरद पवार यांनाही त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. याकडे विसंवादाचे उदाहरण म्हणून पाहिले जाऊ नये.
कपिल सिब्बल यांनी सुरू केली वेबसाइट
कपिल सिब्बल यांनी मार्चमध्ये 'इन्साफ के सिपाही' नामक वेबसाइट सुरू केली. त्यानंतर एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, माझे सहकारी वकील व बिगर भाजप मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, त्यांनी गुलामगिरी संपवण्यासाठी या वेबसाईटच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध आवाज उठवावा.
हे व्यासपीठ देशातील जनतेसाठी आहे. माझ्या मते, मोदीही त्याला विरोध करणार नाहीत. भाजपवर टीका करताना ते म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना विरोध करण्यासाठी बसलो नाही, तर त्यांना सुधारणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.