आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंजाबमधील पत्नीच्या हत्येचा VIDEO:पत्नीचा रुग्णालयात गळा दाबून खून, 4 दिवसांपूर्वी महिलेने दिला होता मुलाला जन्म

कपूरथलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंजाबमधील कपूरथला जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या स्त्रीरोग वॉर्डमध्ये दाखल असलेल्या महिलेची तिच्याच पतीने हत्या केली. या घटनेचा व्हिडीओ रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी बनवला असून तो आता व्हायरल होत आहे.

तो आपल्या पत्नीवर संशय घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे त्याने पत्नीचा गळा आवळून खून केला. हाताने गळा आवळून पत्नीचा मृत्यू झाला यावर विश्वास बसत नसल्याने त्याने पत्नीच्या तोंडावर उशी ठेवली.

4 दिवसांपूर्वी महिलेने मुलाला जन्म दिला होता
महिलेने चार दिवसांपूर्वी एका मुलाला जन्म दिला. सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या जोडप्याने काही वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. दोघांना आधीच एक मुलगा आहे.

उपविभागाचे डीएसपी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, सिव्हिल हॉस्पिटलच्या स्त्रीरोग वॉर्डमधील खासगी खोली 4 मध्ये शनिवारी सकाळी 6 वाजता मनजीत सिंहने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केला. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...