आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karanataka Election Updates Congress VS BJP Mallikarjun Kharge  Narendra Modi Amit Shaha Rahul Gandhi 

कर्नाटकात सभांचा सुपर संडे:करो वा मरोची स्थिती- काँग्रेसची एकजूट; भाजपच्या डावात जेडीएस फसला

विनय माधव | बंगळुरूएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

१९९७ ची गोष्ट आहे, तत्कालीन पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या विरोधात लोकसभेत अविश्वास प्रस्ताव आला होता. तेव्हा ते म्हणाले होते, मी फिनिक्सप्रमाणे राखेतून उठेन (६व्या शतकातील अरबी वाळवंटातील पक्षी जो स्वतःला जाळून पुन्हा जिवंत झाला) त्यांचे विधान राष्ट्रीय राजकारणासाठी खरे ठरले नाही. तथापि, देवेगौडा हे सुनिश्चित करू शकले की जेडीएस, त्यांनी स्थापन केलेला प्रादेशिक पक्ष २००४ पासून कर्नाटकच्या राजकारणात एक प्रभावी खेळाडू बनला आहे.

आज पक्ष अशा टप्प्यावर आहे की, त्यासाठी करा किंवा मरा अशी परिस्थिती आहे. त्यांच्याच बालेकिल्ल्यातील काही जागा पराभवाच्या छायेत आहेत. २० जागा जिंकणे त्यांच्यासाठी मोठे आव्हान आहे. ३ ठिकाणी गौडा कुटुंबातील सदस्य लढत आहेत. त्यापैकी कुमारस्वामी, त्यांचा मोठा भाऊ रवण्णा आणि मुलगा निखिल यांच्यासमोर ही जागा कायम ठेवण्याचे कडवे आव्हान आहे. तिघेही आमदार झाले नाहीत, तर जेडीएसचे अस्तित्व संपुष्टात येण्याची शक्यता आहे. जे जिंकतील ते जेडीएस सोडून काँग्रेस किंवा भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.

जेडीएस कधीच स्वबळावर सत्तेवर आले नाही. देवेगौडा यांचे पुत्र कुमारस्वामी दोनदा मुख्यमंत्री झाले, पण त्यांचा कार्यकाळ अल्प होता.५ विधानसभा निवडणुकांपासून, सरकारची स्थापना प्रत्येक वेळी जेडीएसच्या कामगिरीवर ठरली आहे. जुन्या म्हैसूर भागात जेडीएसची कामगिरी खराब असताना काँग्रेस सत्तेवर आली. त्याचवेळी भाजपची कामगिरी चांगली राहिल्यानंतर सरकार स्थापन केले. यावेळी निवडणुका जवळ आल्यावर जेडीएस मजबूत दिसत होता. सत्ताधारी भाजपच्या विरोधात वातावरण होते. भाजपने अचानक आत्मविश्वासाने प्रचार सुरू केल्यावर जेडीएसचे गणित बिघडले.

आपल्या आमदारांना आणि नेत्यांना इतर पक्षात जाण्यापासून रोखण्यात भाजपला यश आले. विशेषत: बळकट केडर असलेल्या किनारपट्टी आणि मुंबई-कर्नाटक प्रदेशात अशी स्थिती अाहे.माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर आणि लक्ष्मण सावदी यांसारख्या काही नेत्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून पक्षाविरुद्ध बंड केले असले तरी उर्वरित भाजपसोबत राहिले. जेडीएसने पंचरत्न यात्रा सुरू केली तेव्हा १२३ जागांवर लक्ष केंद्रित करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. यामध्ये जुना-म्हैसुरू प्रदेश, मध्य कर्नाटकातील काही जिल्हे आणि हैदराबाद-कर्नाटक प्रदेशातील काही जागांचा समावेश आहे.

२०१८: हसन, मंड्याच्या १४ पैकी १३जागा जिंकल्या, ७ जागी पराभव शक्य
उमेदवारीच्या प्रक्रियेनंतर, भाजपने किनारपट्टी, मलनाड, मुंबई-कर्नाटक प्रदेशात लक्ष केंद्रित करण्याव्यतिरिक्त, जुन्या म्हैसूर प्रदेशासह हैदराबाद-कर्नाटक प्रदेशात जोर लावण्यास सुरुवात केली. सिद्धरामय्या, डीके शिवकुमार यांसारखे काँग्रेसचे स्टार प्रचारक आपापल्या मतदारसंघात व्यस्त राहतील हेही भाजपने पाहिले. कुमारस्वामी यांनी माजी मंत्री सीपी योगेश्वर यांना चेन्नापट्टणा मतदारसंघात उमेदवारी दिली. देवेगौडा यांनी भवानी यांना तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते, पण ते देऊ शकले नाहीत. हसन व मंड्या जिल्ह्यात अशा घटनांमुळे पक्ष अडचणीत आला. २०१८ मध्ये जेडीएसने या दोन जिल्ह्यांमध्ये १४ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या. यावेळी ७ पराभूत होऊ शकतात.

काल संडेला विविध पक्षांच्या सभा होत्या कर्नाटकात पाहा फोटो...