आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी मतदान होत आहे. राज्यातील भावी राजकीय नेतृत्वासाठी ही निवडणूक निर्णायक ठरत आहेत. राज्यातील दिग्गज नेते एकतर निवृत्त झाले आहेत किंवा आपली जागा वाचवण्यासाठी लढत आहेत. अशा नेत्यांमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एचडी कुमारस्वामी, जगदीश शेट्टार, विद्यमान मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, डॉ. जी परमेश्वरा, लक्ष्मण सावदी, प्रियांक खरगे, डीएन जीवराज, माजी सभापती केजी बोपय्या यांचा समावेश आहे.
मात्र, प्रतिस्पर्धी पक्ष त्यांच्या विरोधात कमकुवत उमेदवार उभे करणार असल्याने बड्या नेत्यांना सहज विजय मिळेल, अशी चर्चा होती. तुल्यबळ उमेदवार उभे केल्याने ही चर्चा मागे पडली आहे. बहुतांश नेत्यांमध्ये चुरशीची लढत होत आहे. अशाच नेत्यांमध्ये कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार आहेत. भाजपने केपीसीसी अध्यक्षांविरुद्ध तगडा उमेदवार दिला आहे. यामुळे शिवकुमार आपल्याच मतदारसंघात अडकले आहेत.
कुमारस्वामी : तगडा प्रतिस्पर्धी, मुस्लिम दूर
कुमारस्वामी चेन्नाट्टनातून उभे आहेत. मुलगा निखिल यांना रामनगरमधून तिकीट दिले. त्यांच्याविरुद्ध माजी मंत्री सीपी योगेश्वर आहेत. त्यांना वोक्कालिगांचा पाठिंबा आहे. गेल्या निवडणुकीत कुमारस्वामींनी मुस्लिम मतांकडे दुर्लक्ष केले. या वेळी काँग्रेस मागास वर्गाचे बहुतांश मते कापत आहे. दलित मते समान विभागली जात आहेत.
शेट्टार : भाजपची मते फोडण्याचे आव्हान
भाजपचे माजी सीएम काँग्रेसचे हुबळीचे उमेदवार आहेत. सध्या, शेट्टार यांच्याकडे ५०,००० काँग्रेसचे मतदार आहेत. त्यात मुस्लिम, मागास वर्ग आणि दलितांचा समावेश आहे. या जागेवर भाजपचे केडर आहे. त्यांना भाजपची ३० हजार मते फोडावी लागतील.
सिद्धरामय्या : जातीचे गणित, तगडा विरोधक
अहिंदा (अल्पसंख्याक, मागासवर्गीय आणि दलित) यांच्या जोरावर वरुणाची जागा जिंकण्यात सिद्धरामय्या यांना कोणतीही अडचण नव्हती. यावेळी भाजपने त्यांच्या विरोधात मंत्री व्ही सोमन्ना या लिंगायत नेत्याला उभे केले आहे.आता ती जागा वाचवण्यासाठी सिद्धरामय्या धडपडत आहेत.
बोम्मई : लिंगायत नाराज, मतांचे ध्रुवीकरण
या वेळी दुसऱ्या जागेवरून लढणार असल्याचे संकेत बोम्मई यांनी दिले होते. मात्र, पक्षाने त्यांना शिगगावमधून तिकीट दिले. येथील भीतीचे कारण त्यांचाच लिंगायत समाज अाहे, जो येदियुरप्पांच्या निवृत्तीविरुद्ध आहे.अन्य समुदायातही त्यांच्याबाबत नाराजी आहे. यामुळे विरोधी पक्ष बोम्मई विरोधी मतांच्या ध्रुवीकरणात गंुतले आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.