आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Small Parties Can Be A Hindrance To Victory; Small Parties Became A Headache For Big Parties

कर्नाटक विधानसभा निवडणूक:विजयात छोटे पक्ष ठरू शकतात अडथळा; छोटे पक्ष बनले मोठ्या पक्षांसाठी डोकेदुखी

सुजित ठाकूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे.  - Divya Marathi
कर्नाटकात विधानसभेच्या 224 जागांसाठी 10 मे रोजी मतदान होणार आहे. 

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत थेट लढत भाजप आणि काँग्रेसमध्ये आहे. राज्यातील छोट्या पक्षांमुळे तिसरी शक्ती असलेल्या जेडीएसची चिंता वाढली आहे. हे पक्ष या तिन्ही पक्षांच्या निवडणूक प्रचारावर लक्षणीय परिणाम करत आहेत. आम आदमी पक्ष, बसपा, उत्तम प्राजकिया पार्टी, डावे पक्ष, कर्नाटक राष्ट्र समिती, आणि कल्याण राज्य प्रगती पक्ष अशा छोट्या पक्षांनी राज्यात मोठ्या संख्येने उमेदवारी दिली आहे.

गेल्या निवडणुकीत 28 जागा लढवलेल्या 'आप'ने यावेळी 213 जागांवर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या निवडणुकीत बसपने जेडीएससोबत युती केली होती, मात्र यावेळी पक्ष 137 जागांवर एकटाच निवडणूक लढवत आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेसची खरी चिंता कर्नाटक वंशाचे स्थानिक छोटे पक्ष आहेत.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दिल्लीत ‘आप’ने ज्या थीमवर सुरुवात केली त्याच थीमवर कर्नाटक राष्ट्र समिती निवडणूक लढवत आहे. या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाच घेतल्याचे व्हिडिओ आणि इतर पुरावे सार्वजनिक केले आहेत.

तसेच कल्याण कर्नाटक विभागातील (बेल्लारी) भाजपचे आमदार जी. जनार्दन रेड्डी यांच्या कल्याण राज्य प्रगती पक्षाने 49 जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.

फिल्मस्टार उपेंद्रच्या पक्षाची महिला, तरुणांमध्ये क्रेझ

कन्नड चित्रपट स्टार उपेंद्र यांची उत्तम प्रजाकिया पार्टी रिंगणात आहे. या पक्षाच्या उमेदवारांना तरुण आणि महिलांमध्ये चांगला फॉलोअर असल्याची माहिती आहे. प्रमुख पक्षांची खरी चिंतेची बाब ही आहे की, दोन उमेदवारांमधील मतांमधील फरक जर 1,000 ते 10,000 मतांपेक्षा कमी असेल, तर त्यांच्या विजयांवर परिणाम होऊ शकतो.