आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Assembly Election | Former Chief Minister Shettar's Name Is Not In BJP's Second List Either

कर्नाटक विधानसभा निवडणूक:भाजपच्या दुसऱ्या यादीतही माजी मुख्यमंत्री शेट्टार यांचे नाव नाही, 7 विद्यमान आमदारांचे तिकीट कापले

रवी शर्मा | बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात सत्तारूढ भाजपने बुधवारी रात्री उशिरा २३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. भाजपने आतापर्यंत २२४ सदस्यांच्या कर्नाटक विधानसभेसाठी २१२ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. दुसऱ्या यादीत ७ विद्यमान आमदारांचे तिकीट कापले गेले. यात माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांचे नाव हुबळी-धारवाड सेंट्रलमध्ये आले नाही.

सूत्रांच्या मते भाजप शेट्टार यांना राजकीय संन्यास घेण्याबाबत विनवत आहे. परंतु ६ वेळेस आमदार राहिलेले शेट्टार संन्यासाच्या मूडमध्ये नाहीत. तिकीट मिळाले नसल्याने माजी उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा व मंत्री एस. अंगारा यांनी संन्यासाची घोषणा केली. माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सावदी यांनी थेट पक्षाचा राजीनामा दिला.

हिजाब वादातील उडुप्पीत भट्‌ट यांचे तिकीट कापले
हिजाबविरोधात आंदोलनासाठी देशभरात चर्चेत आलेल्या उडुप्पीचे आमदार रघुपती भट्ट यांचेही तिकीट कापले गेले. बुधवारी माध्यमांसमोर रडत-रडत भट्ट यांनी ते पक्षावर नाराज असल्याचे सांगितले. सूत्रांनुसार भट्‌ट उडुप्पीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढू शकतात.