आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक प्रचार:शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न केल्यास महिलांना 2 लाख, कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे आश्वासन

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करणाऱ्या महिलांना पक्षातर्फे 2 लाख रुपयांची मदत करण्यात येईल, अशी घोषणा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री तथा जेडीएस नेते एच डी कुमारस्वामी यांनी सोमवारी केली. ते कोलार येथील एका प्रचारसभेत बोलत होते.

कुमारस्वामी म्हणाले की, मुली शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्नास नकार देत असल्याची तक्रार माझ्यापर्यंत आली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांशी लग्न करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मुलींना 2 लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. आपल्या मुलांच्या स्वाभिमानाचे संरक्षण करण्याचा हा एक कार्यक्रम असेल.

कर्नाटकात 10 मे रोजी निवडणूक

निवडणूक आयोगाने कर्नाटक विधानसभेची घोषणा केली आहे. त्यानुसार, 10 मे रोजी कर्नाटकमध्ये मतदान होईल. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 13 मे रोजी मतमोजणी होईल. 224 सदस्यीय कर्नाटक विधानसभेत सध्या भाजपचे 119, काँग्रेसचे 75 व जनता दलाचे (एस) 28 सदस्य आहेत. आगामी निवडणुकीसाठी काँग्रेसने 124 उमेदवारांची यादी जारी केली आहे. कर्नाटकात 5.21 कोटी मतदार आहेत.

कर्नाटक निवडणुकीच्या कार्यक्रमाची खालील बातमी वाचा...

निवडणुकीचा बिगुल:कर्नाटकात 10 मे रोजी मतदान, निकाल 13 मे रोजी; वायनाड पोटनिवडणुकीबाबत आयोग म्हणाले- 6 महिने आहे, बघू

कर्नाटक निवडणूकीचा बिगुल वाजला आहे. 10 मे रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होवून निकाल जाहीर होतील. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितले. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. कर्नाटकात 5.21 कोटी मतदार आहेत. जे 224 विधानसभा जागांवर मतदान करणार आहेत. 9.17 लाख मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत.

निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, यापूर्वी एक प्रक्रिया सुरू केली होती. याअंतर्गत 1 एप्रिल रोजी ज्यांचे वय 18 वर्षे पूर्ण होईल, त्यांनाही मतदान करता येणार आहे. दरम्यान, कर्नाटकात यावेळीही मुख्य लढत भाजप, काँग्रेस आणि जेडीएस यांच्यात होणार आहे. मागच्या वेळी जेडीएस-काँग्रेस एकत्र होते. मात्र, यंदाच्या निवडणूकीत जेडीएस स्वतंत्र लढणार आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी...