आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Assembly Election: Rs 100 Crore Seized Within 10 Days Of Election Announcement

कर्नाटक विधानसभा निवडणूक:निवडणूक जाहीर होण्याच्या 10 दिवसांत 100 कोटी रुपये जप्त

बंगळुरू2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटक विधानसभा निवडणूक जाहीर होऊन दहा दिवस झाले आहेत. यादरम्यान निवडणुकीशी संबंधित जप्त रक्कम १०० कोटी रुपयांच्या जवळ पोहोचली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी(सीईओ) कार्यालयाने सांगितले की, २९ मार्चपासून राज्यात आदर्श आचार संहिता लागू झाल्यानंतर ९९.१८ कोटी रु. जप्त केले आहेत. जप्तीत ३६.८ कोटी रु. रोकड, १५.४६ कोटी रु. मोफत वस्तू, ३० कोटी रुपयांचे ५.२ लाख लीटर मद्य, १५ कोटी रुपयांचे सोने आणि २.५ कोटी रुपयांच्या चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. रविवारी राज्य देखरेख पथकाने यादगीर जिल्ह्यात ३४ लाख रु. रोकड आणि बंगळुरू ग्रामीण जिल्हा क्षेत्रात २१ लाख रुपयांचे ५६ टीव्ही जप्त केले. यादरम्यान, काँग्रेस आणि भाजपमध्ये तिकीट वाटपावरून गाेंधळ आहे. भाजपने पहिली यादी जाहीर करण्याच्या प्रयत्नात आहे. दुसरीकडे, काँग्रेस ५८ जागांवर उमेदवार निश्चित करत आहे. त्याने दोन यादीतून १६६ उमेदवारांची घोषणा केली आहे. २२४ सदस्यीय कर्नाटक विधानसभेसाठी १० मे रोजी मतदान होऊन १३ मे रोजी निकाल जाहीर होईल.