आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकर्नाटक विधानसभा निवडणूक ३ दिवसांवर आली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध पक्ष संपूर्ण ताकद पणाला लावत आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी २६ किमी लांब रोड शो साडे चार तासंात पूर्ण केला. त्यात त्यांनी १३ विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. यानंतर बदामी आणि हावेरीमधील सभेत त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. मोदी म्हणाले, त्यांच्याकडे(काँग्रेस) माहित नाही कोणता पंजा आहे, जो १ रुपयातील ८५ पैसे खातो? काँग्रेसच्या याच कुकर्मांमुळे आपला देश एवढी दशके मागे राहिला. एवढेच नव्हे तर काँग्रेसने आपल्या कार्यकाळात जे आजारपण जोपासले त्यावर भाजप कायमस्वरूपी इलाज करत आहे. मोदींनी काँग्रेसचा जाहीरनामा पूर्णपणे तुष्टीकरण असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान म्हणाले, कर्नाटकला क्रमांक एकचे राज्य बनवण्यासाठी भाजपने कृती आराखडा आणला आहे. काँग्रेस तुष्टीकरण, टाळेबंदी आणि शिविगाळ निवडणुकीचा मुद्दा बनवेल,असे मोदी म्हणाले.
खरगेंच्या हत्येचा कट रचतेय भाजप : सुरजेवाला
निवडणूक प्रचारात शनिवारी नेत्यांनी वैयक्तिक आरोप-प्रत्यारोप केले. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे व त्यांच्या कुटुंबाच्या हत्येचा कट भाजप नेते रचत असल्याचा अारोप काँग्रेसचे कर्नाटक प्रभारी रणदीप सिंह सुरजेवाला यांनी केला आहे. बंगळुरूत पत्रकार परिषदेत सुरजेवाला यांनी एक आॅडिओ क्लिप ऐकवली. त्यातील आवाज चित्तपूर मतदारसंघातील भाजप उमदेवार मणिकांत राठोड यांचा आहे. क्लिपमध्ये खरगे आणि त्यांच्या कुटुंबाला ठार करण्याचे बोलले जात आहे. सुरजेवाला यांनी राठोड पीएम आणि सीएम बोम्मई यांचे चाहते असल्याचे म्हटले आहे. राठोड यांनी प्रथम खरगेंचे पुत्र आणि चित्तपूरचे पक्षाचे उमेदवार प्रियांक यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
भाजप दरोडा टाकून सत्ता घेणारा : सोनिया
काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी शनिवारी कर्नाटकमध्ये प्रथमच निवडणूक प्रचार केला. त्यांनी हुबळीत सांगितले की, भाजप असा पक्ष आहे, जो दरोडा टाकून सत्ता हस्तगत करण्यात माहीर आहे. त्यांना लोकशाहीशी देणे-घेणे नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.