आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Karnataka Assembly Elections 2023; Sonia Gandhi Election Rally | Congress | Rahul Gandhi

कर्नाटक निवडणूक:आज सोनिया गांधींची पहिली सभा, 4 वर्षांनंतर निवडणूक प्रचारासाठी येणार, हुबळीत करणार संबोधित

24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्नाटक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने पहिल्यांदाच सोनियांना निवडणूक प्रचारात उतरवले आहे.   - Divya Marathi
कर्नाटक निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने पहिल्यांदाच सोनियांना निवडणूक प्रचारात उतरवले आहे.  

काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी चार वर्षांत पहिल्यांदाच प्रचारासाठी जाणार आहेत. शनिवारी त्या कर्नाटकातील हुबळी येथे जाहीर सभेला संबोधित करणार आहेत.

हुबळी-धारवाडमधील काँग्रेसचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांच्या प्रचारासाठी सोनिया गांधी सभा घेणार आहेत. तिकीट न मिळाल्याने शेट्टर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. येथे भाजपने महेश टेंगींकाई यांना उमेदवारी दिली आहे.

सोनिया अखेरीस भारत जोडो यात्रेत दिसल्या

सोनिया गांधी यांनी प्रकृतीच्या कारणास्तव कोणत्याही निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार केला नाही किंवा 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर पक्षाच्या कोणत्याही जाहीर सभेत भाग घेतला नाही. मात्र, गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये त्या कर्नाटकातील मंड्या येथे राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या होत्या.

7 महिन्यांपूर्वी, राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्या सोबतचा हा फोटोवर ट्विट केला होता. त्यावर त्यांनी लिहिले होते की, ‘हम पहले भी तूफानों से कश्ती निकालकर लाए हैं। हम आज भी हर चुनौतियों की हदें तोड़ेंगे, मिलकर भारत जोड़ेंगे।’
7 महिन्यांपूर्वी, राहुल गांधी यांनी आई सोनिया गांधी यांच्या सोबतचा हा फोटोवर ट्विट केला होता. त्यावर त्यांनी लिहिले होते की, ‘हम पहले भी तूफानों से कश्ती निकालकर लाए हैं। हम आज भी हर चुनौतियों की हदें तोड़ेंगे, मिलकर भारत जोड़ेंगे।’

काँग्रेसच्या आतापर्यंत 43 सभा, 13 रोड शो

काँग्रेसने यावेळी आपल्या कर्नाटक निवडणुकीच्या प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही. पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी आतापर्यंत 43 सभा, 13 रोड शो, महिला आणि तरुणांशी सहा संवाद तसेच कार्यकर्त्यांसोबत पाच बैठका घेतल्या आहेत. रविवारी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी बेंगळुरूच्या शिवाजी नगरमध्ये संयुक्त सभा घेणार आहेत.

हे छायाचित्र 3 मे चे आहे. प्रियांका गांधी यांनी कर्नाटकातील मंड्या येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर चिंतामणी परिसरात रॅली काढण्यात आली.
हे छायाचित्र 3 मे चे आहे. प्रियांका गांधी यांनी कर्नाटकातील मंड्या येथे जाहीर सभेला संबोधित केले. त्यानंतर चिंतामणी परिसरात रॅली काढण्यात आली.

आमदारांना पैसे देऊन चोरुन आलेले सरकार : राहुल

राहुल गांधींनी 1 मे रोजी कर्नाटकात तीन जाहीर सभा घेतल्या. यावेळी ते म्हणाले की, पंतप्रधान कर्नाटकात येतात, पण फक्त स्वत:बद्दल बोलतात. पंतप्रधानांच्या वक्तव्यावर राहुल यांनी ही प्रतिक्रिया दिली होती, ज्यात मोदींनी जनतेसमोर मला शिव्या दिल्या जात असल्याचे सांगितले होते.

राहुल म्हणाले की, तुम्ही हे सरकार निवडून दिले नाही, आमदारांना पैसे देऊन चोरी करून आलेले सरकार आहे. कर्नाटकातील पाच-सहा वर्षांच्या प्रत्येक मुलाला माहित आहे की हे 40% सरकार आहे.

प्रियंका म्हणाल्या, पंतप्रधांना सार्वजनिक समस्यांची यादी दिसत नाही

राहुल गांधी यांच्या शिवाय प्रियांका गांधी यांनी देखील तीन दिवसांपूर्वी सभा घेतली होती. ज्यात त्यांनी पंतप्रधान कार्यालयात बसून कोणीतरी यादी बनवली असल्याचे म्हटले होते. ती यादी जनतेच्या किंवा शेतकऱ्यांच्या समस्यांची नाही. या यादीमध्ये मोदीजींना कोणी आणि किती वेळा शिवीगाळ केली याची माहिती आहे. प्रियंका म्हणाल्या की, मोदीजींना दिलेल्या शिव्या एका पानावर लिहिल्या आहेत. या लोकांनी माझ्या कुटुंबियांना दिलेल्या शिव्यांची यादी तयार केली तर पुस्तक छापले जाईल.